शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

"सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य", सुनील तटकरेंची खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:54 IST

Sunetra Pawar: बारामतीजवळ विमान अपघात होऊन अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी येऊन पडली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नवीन जबाबदारीही देण्यात आली. 

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या हळूहळू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवल्या जात आहेत. मंगळवारी (३ जानेवारी) सरकारने बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली. सरकारच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खास पोस्ट शेअर करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी पार पडला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुनेत्रा पवारांनी पक्षाकडून दिलेली जबाबदारी स्वीकारली. 

"अजित पवारांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड जिल्ह्यांचे..."

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक पोस्ट शेअर केली. 

तटकरे म्हणाले, "सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य... आपले सर्वांचे नेते, आपले प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व केले."

"दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली, पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली... दादांच्या पश्चात आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राला आधार दिला. त्यापुढे जात आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", अशा भावना सुनील तटकरेंनी व्यक्त केल्या. 

"आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रवासात माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आपल्यासोबत ठामपणे उभा आहे. आपले नेतृत्व महाराष्ट्राला क्षणोक्षणी अजितदादांच्या नेतृत्वाची आठवण करून देणारे ठरेल हा मला विश्वास आहे. आपणांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा", असे म्हणत तटकरेंनी या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar's courage indescribable, says Sunil Tatkare in heartfelt post.

Web Summary : Following her husband's death, Sunetra Pawar assumes ministerial responsibilities. Sunil Tatkare praised her courage in taking over leadership roles in Pune and Beed districts, emphasizing the party's full support for her leadership.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण