शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:03 IST

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

ठळक मुद्देसाखर पट्ट्यातील ऊस दर आंदोलन चिघळणार११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा

सांगली : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरु झाले तर, एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरुप सांगलीत जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात सर्वत्र  चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. हे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.संघटनेतर्फे तशा आशयाची लेखी पत्रे प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात येणार आहेत. तोडगा न काढता दडपशाहीच्या मागार्ने हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही संघटनेने म्हटले आहे.दिवाळी संपताच शुक्रवार किंवा शनिवारपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतल्याने संघटनाही आक्रमक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोडोली येथील ऊस परिषदेत एफआरपी व जादा २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली.उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रसंगी सरकार तिजोरी रिकामी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यानुसार एफआरपी व जादा २०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस पुरवठा करायचा नाही, असा निर्णय शेतक?्यांनीच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला आहे.कोणत्याही कारखान्याने शेतक?्यांनी मागणी केलेले अंतिम बिल व यंदाच्या पहिल्या उचलीसंदर्भात कारखान्याची भूमिका काय आहे? याबद्दल स्पष्ट केलेले नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून कारखाना सुरू करणार असल्याचे आम्हाला समजले आहे. ऊसदराचे कोणतेही धोरण जाहीर न करता हंगाम सुरू केल्यास संघटना ते चालू देणार नाही, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना