शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात; शासनाच्या महाभियोक्तांची न्यायालयात टिप्पणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:23 IST

उद्या, होणार सुनावणी

कोल्हापूर : ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफ.आर.पी.ची गरज नसून राजू शेट्टी यांच्यासह पाच-सहा शेतकऱ्यांना शासन निर्णयास विरोध आहे, उर्वरित राज्यातील कोणाही ऊसउत्पादक शेतकऱ्यांना याविरुद्ध आक्षेप नाही, गेली तीन वर्षे कोणीही एक व्यक्तीने विरोध केलेला नाही, याउलट शेट्टी हेच साखर कारखानदार व राज्य सरकारला वेठीस धरत असल्याची टिप्पणी करत तीन टप्प्यांतील एफ.आर.पी चा कायदा पूर्ववत ठेवावा, अशी मागणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महाभियोक्ता ॲड. विरेन सराफ यांनी केली.‘एफआरपी’चे तुकडे करणाऱ्या शासन निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्ते श्री. राजू शेट्टी यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी सलग दोन तास बाजू मांडली. जर विषय संख्येचाच असल्यास आमची तयारी आहे, उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढच्या तारखेला हजारो शेतकऱ्यांनाच उच्च न्यायालयात न्याय मागणीसाठी उभे करण्यास परवानगी देण्याचा आग्रह ॲड. पांडे यांनी धरला. याबाबत, उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

कारखानदारांनी सुधारित कायद्याचा आधार घेऊन चालू हंगामातील १० हजार कोटींची एफआरपी थकवली आहे. शेतकऱ्यांच्या करातून गोळा झालेल्या सरकारच्या तिजोरीतून पगार घेणाऱ्या महाभियोक्ता व ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वर्गणीवर चालणाऱ्या राज्य साखर संघाने शेतकरी हिताची बाजू घेणे अपेक्षित होते. मात्र, दोघेही साखर कारखानदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना मातीत गाडण्याचे काम करत आहेत. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीCourtन्यायालय