शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:12 IST

देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

ठळक मुद्देउशिरा हंगाम सुरु झाल्याने उत्तरप्रदेश पिछाडीवरदेशात ५३० ते ५५० साखर कारखाने दरवर्षी गाळप हंगामगेल्या वर्षी याच काळात ३४९ साखर कारखाने सुरुदेशात ४ हजार लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज

पुणे : देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने उशिरा सुरु झाल्याने तेथे १५ नोव्हेंबर अखेरीस केवळ पावणेदोन लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे. देशात ५३० ते ५५० साखर कारखाने दरवर्षी गाळप हंगाम घेतात. यंदा १५ नोव्हेंबर अखेरीस २३८ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरु झाले होते. गेल्या वर्षी याच काळात ३४९ साखर कारखाने सुरु झाले होते. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा १११ कारखान्यांचे बॉयलर अजून पेटले नाहीत. देशात आत्तापर्यंत ११.६३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १३.७३ लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्रात १५ नोव्हेंबर पर्यंत १०८ साखर कारखान्यातून ६.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सोमवार (दि. १९) अखेरीस महाराष्ट्रातील ७२ सहकारी अणि ५७ खासगी साखर कारखाने अशा १२९ कारखान्यांचे बॉयलर पेटले होते. त्यातून ९७.८९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा ९.२२ टक्के इतका मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने यंदा उशीरा सुरु झाले. त्यामुळे ३८ साखर कारखान्यातून १.७६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात उत्तर प्रदेशातील ७१ साखर कारखान्यांतून ५.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकातील ३६ साखर कारखान्यांतून १.८५ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्या वर्षी याच काळात ५९ साखर कारखान्यांमधून ३.७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गुजरातमधील १४ कारखान्यांनी १ लाख टन, तर तमिळनाडूतील ४ साखर कारखान्यांमध्ये १५ नोव्हेंबर अखेरीस ६० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ---------------------

देशात ४ हजार लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाजदेशात ३८३८.९२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्याच्या सांखिकी विभागाने सप्टेंबर अखेरीसच्या आकडेवारीवरुन वर्तविला होता. राज्यात सुरुवातीस साडेनऊशे लाख टन ऊस ागळपाचा अंदाज होता. मात्र, हुमणी रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळी स्थिती यामुळे साडेआठशे लाख टनापर्यंत ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा सुधारीत अंदाज आहे. त्यामुळे त्या प्रमाणात सप्टेंबरच्या अंदाजातही काहीशी घट होईल.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र