शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 19:18 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठीचे सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगणाऱ्या शिवसेनेवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. महायुती करून निवडणूक लढवल्यानंतर शिवसेनेने सर्व पर्याय खुले आहेत, असं म्हणणं म्हणजे विनाशकाले विपरित बुद्घी असल्याचे मुनगंटीवारी यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ''दुष्यंत चौटाला हे निवडणुकीपूर्वी आघाडीमध्ये सामील नव्हते. मात्र शिवसेना आणि भाजपाची निवडणूकपूर्व युती होती. अशी युती ही एंगेजमेंटसारखी असते. आता शिवसेनेकडे सर्व पर्याय खुले असतील, तर आमच्याकडेही पर्याय खुले आहेत.'' दरम्यान, आज भाजपा आणि शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.  मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपाकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात यासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपामध्ये 50-50 फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला होता. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात की, असे काही ठरलेच नव्हते. मग, लोकसभेवेळी असे काय ठरले होते, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019