Sudhir Mungantiwar criticized Varis Pathan over controversial statements | वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार

वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते आणि भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी', या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. त्यांनतर वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असून, थेट माफी मागितलेली नाही. यावरुन भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा”, असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.

मात्र, वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असून, थेट माफी मागितलेली नाही. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असा टोला मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लगावला. तर वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


 

Web Title: Sudhir Mungantiwar criticized Varis Pathan over controversial statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.