शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

असाही सामाजिक न्याय : लाड यांच्या कंपनीला ‘प्रसाद’, निविदा न काढताच दिले कोट्यवधी रुपयांचे कंत्राट

By यदू जोशी | Published: February 26, 2018 3:41 AM

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयांच्या मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांवर पुन्हा एकदा मेहेरबान झाले आहेत.

यदु जोशी मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयांच्या मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांवर पुन्हा एकदा मेहेरबान झाले आहेत. या दोन कंपन्यांना शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा आणि सामाजिक न्याय भवनाचे साफसफाईचे कोट्यवधी रुपयांचे काम विनानिविदा देण्यात आले आहे.या दोन्ही कंपन्यांना मूळ कंत्राट आघाडी सरकारच्या काळात मिळालेले होते. त्यात स्वच्छता व सुरक्षा या कामापोटी या कंपन्यांना दरमहा ९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाकडून दिले जात. या कंपन्यांना मिळालेल्या कंत्राटाची मुदत आॅक्टोबर २०१६ मध्ये संपली. मात्र, भाजपा सरकारने निविदा प्रक्रिया न राबविता या दोन कंपन्यांना मुदतवाढ दिली आहे. साफसफाईसाठी दरमहा साडेआठ कोटी रुपयांचे काम नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विनानिविदाच देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्वत: बडोले यांनी एका कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचा शेरा देत, तिला काळ्या यादीत का टाकले नाही, अशी विचारणा केली होती.तीन महिन्यांपूर्वी पुन्हा नवीन निविदा काढण्यात आली. तथापि, तीदेखील पूर्ण न झाल्याचे कारण देत आता पुन्हा या दोन कंपन्यांच्या कंत्राटास मुदतवाढ देऊन त्यांना दरमहा साडेआठ कोटी रुपये मिळतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पद्धतीने दोन्ही कंपन्यांना आक्टोबर २०१६ पासून आतापर्यंत जवळपास १६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच, महागाई निर्देशांकाचे कारण देऊन आणखी २२ कोटी रुपये दिले जाऊ शकतात.कोणत्याही शासकीय विभागाने विनानिविदा कामे करू नयेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट आदेश असताना सामाजिक न्याय विभागाने मात्र विनानिविदा काम देणे सुरू ठेवले आहे. या दोन कंपन्यांवर कृपावंत होताना बडोले यांनी, हे काम विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छता विषयाशी संबंधित असल्याने नवीन निविदा अंतिम होईपर्यंत दोन्ही कंपन्यांना मुदतवाढ दिल्याची भूमिका घेतली आहे. या मुदतवाढीसाठी अमरावतीच्या एका व्यक्तीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती घोटाळ्यात असलेल्या या व्यक्तीचा सामाजिक न्याय विभागातील वावर सध्या कमालीचा वाढला आहे.चौकशी करून तत्काळ अहवाल सादर कराया कामासाठी निविदा काढावी, असे आदेश आपण १७ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेले होते. तरीही ई-निविदा प्रक्रिया आजपर्यंत अंतिम का झाली नाही? या दिरंगाईसाठी विभागाच्या सचिवांनी चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे बडोले यांनी मुदतवाढ देतानाच्या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले