शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

शालेय पोषण आहार धान्य वितरणाचा अहवाल सादर करा; शिक्षण संचालकांचा राज्यातील शाळांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:16 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती.

ठळक मुद्दे'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर किती शाळांमधील शिल्लक धान्याचे किती विद्यार्थ्यांना वितरण या संदर्भातील 6 एप्रिलपर्यंतचा अहवाल

पुणे: शालेय पोषण आहार योजने अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना वितरित केल्याचा 6 एप्रिलपर्यंतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती . त्यामुळे शालेय पोषण आहारता दिल्या जाणाऱ्या तांदळाचे व कडधान्याचे वाटप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये करावे, असे आदेश राज्य शासनातर्फे  देण्यात आले होते. 'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता.  सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिले जाणारे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 27 मार्च रोजी शिक्षण संचालक कार्यालयाने शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.धान्य वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात. धान्य वाटप करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे,अशाही सूचना शासनाने दिल्या होत्या.त्यानुसार किती शाळांमधील शिल्लक धान्याचे किती विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले, या संदर्भातील  6 एप्रिलपर्यंतचा अहवाल येत्या मंगळवारपर्यंत (दि 7) सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत..................

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस