शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला वाचनालयात बसवलं; दहिसरमधील शाळेच्या चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:52 IST

Dahisar School Fee Controversy: दहिसर येथील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थिनींना वर्गाऐवजी वाचनालयात बसविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दहिसर येथील इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थिनींना वर्गाऐवजी वाचनालयात बसविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे विद्यार्थिनीला वेगळी वागणूक देऊन शाळेने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, शाळेने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

२३ जानेवारी रोजी पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे पालक सुधीर कदम यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार पहिल्या सत्राचे १२,५०० रुपयांचे शुल्क भरल्यानंतर दुसऱ्या सत्राचे शुल्क भरण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे आणखी मुदत मागितली होती. मात्र, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी प्राथमिक शाळेने चार विद्यार्थिनींना वर्गात बसू न देता वाचनालयात वेगळे बसवले. या काळात विद्यार्थिनींना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नियमित तासिकांना बसता आले नाही, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, असा आरोप पालकांनी केला आहे.

"शाळेने वर्गाच्या ऐवजी शाळेच्या वाचनालयात मुलींना बसवल्याची तक्रार आहे. त्याबाबतची चौकशी सुरू आहे. संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे अधिक विचारणा करावी", असे दहिसर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावी म्हणाले की,"या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांवरील भेदभाव कायद्याने मनाई आहे. संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश उपशिक्षण निरीक्षकांना देण्यात आले आहेत."

"थकीत शुल्कामुळे पालकांना अनेकदा स्मरणपत्र पाठवले. पालकांनी मात्र राजकीय पक्षांद्वारे शुल्कमाफीसाठी दबावतंत्र वापरले", असे दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव आशिष गिरम म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dahisar School Investigated for Making Student Sit in Library Over Fees

Web Summary : Dahisar school faces inquiry for allegedly making students sit in the library due to unpaid fees, sparking parental outrage and allegations of mental harassment. The school denies the charges, claiming parents used political pressure for fee waivers.
टॅग्स :dahisar-acदहिसरMaharashtraमहाराष्ट्र