शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'एसटी'चे आणखी एक पाऊल 'कॅशलेस' कडे ; प्रवाशांसाठी 'ओव्हर द काऊंटर' कार्ड सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 20:57 IST

‘ओटीसी’ कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही...

ठळक मुद्देएसटीने करार केलेल्या एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड मिळणार आहे.

पुणे : ‘एसटी’कडून बसमध्ये पैशांची देवाण-घेवाण कॅशलेस होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. सध्या विविध सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. हे स्मार्टकार्ड संबंधित प्रवाशांच्या आधार कार्ड व मोबाईलशी लिंक केलेले असते. पण आता कोणत्याही ओळखपत्राची गरज नसलेले ‘ओटीसी’ कार्ड तयार करण्यात आले आहे. या कार्डचा वापर कोणीही करू शकणार आहे.

विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्टकार्ड पाठोपाठ आता एसटी महामंडळाने ओव्हर द काऊंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही.

‘ओटीसी’ कार्ड स्मार्टकार्ड सारखेच असले तरी त्यावर छायाचित्र किंवा प्रवाशाचे नावही नसेल. एसटीने करार केलेल्या एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड मिळणार आहे. एसटी बसस्थानकांवर हे कार्ड मिळणार नाही, असे एसटी स्पष्ट करण्यात आले आहे. एजंटला प्रवाशाचे नाव व मोबाईल क्रमांक सांगितल्यानंतर लगेच हे कार्ड मिळू शकेल. त्यावर फक्त कार्डचा नंबर व अन्य माहिती असणार आहे. या एजंटकडूनच प्रवाशांना आपल्या प्रवास खर्चानुसार रिचार्ज करून मिळेल. त्यांना पैसे दिल्यानंतर कार्ड रिचार्ज होईल.---------------असा करता येईल वापररिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये वाहकाकडे द्यावे लागेल. वाहक आपल्याकडी ‘ईटीआयएम’ मशीनवर हे कार्ड लावेल. कार्डची माहिती मशीनवर आल्यानंतर प्रवाशांना उतरण्याचा थांबा सांगावा लागेल. त्यानुसार वाहक मशीनमधील थांबा निवडेल. कार्डमध्ये पुरेसे पैसे असल्यास वाहकाकडून पुढील प्रक्रिया करून प्रवाशांना तिकीट दिले जाईल. कार्डमध्ये पैसे नसल्याने प्रवाशांना रोख रक्कम द्यावी लागेल. ही प्रक्रिया करताना प्रवाशाला कोणतेही ओळकपत्र दाखवावे लागणार नाही.

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सdigitalडिजिटलMONEYपैसा