शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

"कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 18:53 IST

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

"मुंबई-त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरवून व त्यातून अल्पसंख्याक तरुणांची माथी भडकवून काल महाराष्ट्रात हिसंक दंगली घडविण्याचे काम रजा अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाप्रकारची देश व समाजविरोधी कृत्य करणाऱ्या व धर्मांध प्रवृतींना खतपाणी घालणाऱ्या रजा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी व या रजा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे करावी," अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

"महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असताना दरवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगल घडविण्याचे काम रजा अकादमी कडून सातत्याने करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये सुद्धा याच रजा अकादमीने मुंबईत मोर्चा दरम्यान संपूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती, इतकेच नव्हे तर महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार त्यांनी केला होता," असंही भातखळकर म्हणाले. "मागील वर्षी कोरोनाच्या काळात फ्रान्स मधील कथित अल्पसंख्याक विरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागात आंदोलन करत दंगल भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राज्यात अशा औरंगजेबी प्रवृत्तीना वेळीच ठेचणे गरजेचे आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण रजा अकादमीच्या विरोधात कठोर कारवाई करावी," अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेने  २०१२ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी रजा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती, याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरAmravatiअमरावतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे