शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 18:34 IST

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत तावडेंनी अशोक चव्हाणांना डिवचणारे वक्तव्य केलं होतं.

मुंबई - काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भोकर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या सल्ल्याबाबतचे मत मांडले आहे. भाजपाने आपल्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंना या यादीत स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नेटीझन्सकडून खडसेंबद्दल सहानुभूती तर तावडेंची खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात, आता अशोक चव्हाण यांचीही भर पडली आहे.    

काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महाआघआडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंना भाजपाने उमेदवारी न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, अशी वेळ कुणावरही येऊ नये. आज मी त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय झाल्या असतील, हे समजू शकतो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर, आता अशोक चव्हाण यांनीही आपला तावडेंनी दिलेल्या सल्ल्याला उत्तर दिलंय.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत तावडेंनी अशोक चव्हाणांना डिवचणारे वक्तव्य केलं होतं. लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात, त्यामुळे विधानसभेत झाकली मुठ ठेवा, असा सल्लाही त्यांनी चव्हाण यांना दिला होता. काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही, त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील, असे तावडेंनी म्हटले होते. मात्र, आज तावडेंचच तिकीट भाजपाने कापलं आहे. त्यामुळे तावडेंवरच विधानसभेत न जाण्याची वेळ आली आहे. तावडेंच्या या विधानाचा योग्य वेळेची संधी साधून अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे. निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

  

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेAshok Chavanअशोक चव्हाणMumbaiमुंबईcongressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019