कथा वारक:यांच्या अष्टगंधाची
By Admin | Updated: July 10, 2014 01:17 IST2014-07-10T01:17:07+5:302014-07-10T01:17:07+5:30
मुखी हरिनाम, डोक्यावर टोपी किंवा पागोटे, खांद्यावर पताका, गळ्यात टाळ अशा रूपात दिसणारे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप:यात पसरले आहेत.

कथा वारक:यांच्या अष्टगंधाची
ब्रrानंद जाधव - मेहकर (बुलडाणा)
मुखी हरिनाम, डोक्यावर टोपी किंवा पागोटे, खांद्यावर पताका, गळ्यात टाळ अशा रूपात दिसणारे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप:यात पसरले आहेत. आता प्रत्येक वारकरी कपाळी टिळा लावतो, पूर्वी मात्र गोपिचंदनासह केवळ बुक्का लावीत असत. या बुक्क्यासोबत अष्टगंध लावण्याची प्रथा, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील संत बाळाभाऊ महाराज पितळे यांनी 19क्6मध्ये पंढरपूर येथे सुरू केली. आजतागायत वारक:यांमध्ये अष्टगंध लावण्याची प्रथा सुरू आहे.
मेहकर ही अनेकविध वैशिष्टय़ांनी नटलेली ऐतिहासिक व पुराण प्रसिद्ध नगरी आहे. येथे 1888मध्ये जन्मलेले संत बाळाभाऊ महाराज पितळे ऊर्फ श्वासानंद सरस्वती यांना मानणारा भक्तवर्ग महाराष्ट्रासह परप्रांतातही विखुरलेला आहे. त्यांनी केलेल्या अनेक दिव्य लिलांचा उल्लेख त्यांच्या जीवन चरित्रमध्ये आहे. जातिभेद निमरूलन, धर्मशुद्धीकरण व समाज परिवर्तनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. मेहकरचे मानबिंदू मानल्या जाणा:या संत बाळाभाऊ महाराजांचे संप्रदायात मोठे योगदान आहे. पूर्वी वारकरी कपाळी गोपिचंदनासह केवळ बुक्का लावीत. देवाच्या कपाळी अष्टगंध व भक्ताच्या कपाळी बुक्का, ही प्रचलित रुढी होती; मात्र ‘देव पहावया गेलो! तव तो देवची होऊनी ठेलो!’ या तुकोक्तीप्रमाणो महाराज भक्ताला देवस्वरूप मानत असत. त्यांनी 19क्6 साली पंढरपूरला एका नामसप्ताहामध्ये चतुराबाई नावाच्या महिला शिष्याच्या आग्रहामुळे, देव व भक्तामधील हा भेद दूर करून कपाळी बुक्क्यासह अष्टगंध लावण्याचा प्रघात सुरू केला.
विदर्भात वारकरी
परंपरेचे बीजारोपण
संत बाळाभाऊ महाराजांनी प.पू. अमळनेरकर महाराजांच्या पायी ¨दंडीमध्ये अमळनेर ते पंढरपूर अशा तीन वारी केल्या. त्यानंतर प.पू. अमळनेरकर महाराजांच्या आ™ोवरून त्यांनी विदर्भातून पहिली पंढरपूर दिंडी 19क्4 साली सुरू करून विदर्भात वारकरी भक्ती परंपरेचे बीजारोपण केले.