आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट

By Admin | Published: March 16, 2017 02:30 PM2017-03-16T14:30:51+5:302017-03-16T14:33:20+5:30

मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे.

The story of Kalingaad of Manohar Parrikar explaining the meaning of life | आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट

आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 16 - साधी राहणी आणि पारदर्शक कारभार ही मनोहर पर्रिकरांची मुख्य ओळख. उच्च शिक्षित असूनही पर्रिकरांनी नेहमीच स्वत:ला तळागाळातील जनतेशी जोडून ठेवले. त्यामुळे आजच्या तारखेला त्यांच्या इतका गोव्यात दुसरा लोकप्रिय नेता नाही. गोव्यात फक्त त्यांच्या नावावरच अन्य पक्षांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त 13 जागा जिंकूनही आज गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले. 
 
हेच मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. पर्रिकरांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली ही गोष्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  
 
कलिंगडातून मनोहर पर्रिकरांनी समजावला आयुष्याचा अर्थ 
 
मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. 
 
साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. 
 
ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. 
 
पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. 
 
कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये 25 वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या 200 वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते. आपण प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार दिले पाहिजेत. 
 

Web Title: The story of Kalingaad of Manohar Parrikar explaining the meaning of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.