शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 18:40 IST

आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण..गिटारच्या सुरांनी त्याचं आयुष्य बदललं...

ठळक मुद्देएकाच वर्गात दोनदा नापास म्हणून शिक्का

पुणे : चित्रपटाला शोभेल अशी 'त्या' ची कहाणी.. शिक्षणातही एकाच वर्गात दोनदा नापास म्हणून शिक्का त्याच्या वाटेला आला .शाळेला रामराम ठोकल्यानंतर त्याला ४४० व्होल्टेज प्रेमभंगाचा झटका त्याला सहन करावा लागला. सगळीकडे फक्त अपयशाचा अंधार. आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण... रस्त्यावरच्या एका भेटीने त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली..गिटार वादनाने कलेच्या प्रांतात यशाची उत्तुंग भरारी घेत आयुष्याला अर्थ व इतरांच्या जीवनाला गिटारच्या सुरांनी सजवणाऱ्या ' त्या' मित्राची जागतिक संगीत दिनानिमित्त ही कहाणी....! त्याचं नाव सनी मच्छिंद्र पाचर्णे.. अभ्यासाची आवड नसल्याने सहावी, सातवी आणि आठवीला प्रत्येकी दोन वेळा नापास झालेला हा मुलगा.. एकेदिवशी नैराश्यातून वडिलांनी रागाच्या भरात त्याचे दप्तर मुळा मुठा नदीत दप्तर फेकून दिले. त्याचवेळी शाळेचा प्रवास वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला. अज्ञान , टुकार साथसंगत, मौजमजा यातून गुंडगिरीकडे वाटचाल सुरु झाली. मात्र, एक दिवस आई वडिलांनी शाळा शिकायची नसेल आणि घरात राहायचे असेल, तर गुंडगिरी सोडून काम करून दोन पैसे कमवावे लागतील. तरच घरात जागा मिळेल, असा सज्जड दम दिला.

त्यानंतर कोरेगावपार्क  येथील एका जिममध्ये साफसफाईचे काम मिळाले. फेसबुकच्या माध्यमातून पुण्याबाहेरील मुलीशी प्रेम जुळले. कामाच्या ठिकाणी सततचा होणारा अपमान प्रेमाच्या दुनियेमुळे फारसा लक्षात राहत नसे. एके दिवशी जिम शेजारील बंगल्याच्या गार्डनमध्ये गिटार वादन करणाºया काही मुलांना पहिले. नित्यनियमाने ते पाहण्यासाठी जात असे. मात्र तिथे असलेला सुरक्षारक्षक हाकलून देत असे. जिममध्ये होणारा अपमान आणि सुरक्षारक्षकाचे हाकलून देणं हे अंगवळणी पडले होते. दररोज होणारी ही अवहेलना मित्र,, शेजारी यांच्या चेष्टेचाही विषय ठरत होता.  पण एकमेव ती व्यक्ती अशी होती की ती त्याच्याशी प्रेमाने बोलत असे हाच काहीसा त्याच्या बाजूने पडणारा नशिबाचा कौल. . बाकी सगळे फासे तसे आयुष्यात उलटेच.. मात्र त्यातही त्याच्या कानात बंगल्यात वाजणाऱ्या गीताचे सूर नेहमी गुणगुणत असत.. त्याचा निश्चय पक्का होता की एक ना एक दिवस गिटार वाजवणार.. या दृष्टीने मित्र योगेश यादवच्या मदतीने कलासची चौकशी केली. त्यांनतर गिटार वादनाचा प्रवास सुरु झाला. सगळे काही सुरळीत असताना सफाईकामगार असल्याचे आणि शाळा शिकत नसल्याचे प्रेयसीला समजले. मला समजून घेणारी अशी ती  एकच होती की, जिच्यामुळे जीवन जगण्याचा आनंद मिळत होता. ‘तू झिरो आहेस, तू आयुष्यात काही करू शकत नाहीस’. असे म्हणून तिनेही शेवटी नाकारले. आयुष्याची दिशा सापडली असे वाटत असताना पुन्हा एकदा त्याच्या जीवनाची नौका  व्यसन , आत्महत्येच्या विचारांनी हेलकावे खाऊ लागली. त्या काळात गिटार वादनामुळे मनात येणारे वाईट विचार, नैराश्य दूर होण्यास खूप मदत झाली.      एकदा एका चौकात गिटार वादन करत असताना प्रशांत दे नावाच्या बंगाली व्यक्तीने सूर चुकत असल्याचे सांगितले. चूक सांगणारा पहिला तो पुढे गुरुस्थानी संगीताचा गुरु झाला.. तो खूप छान गातो. त्याच्या सल्ल्याने गिटार वादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला. एका विद्यार्थ्यांपासून वर्ग सुरु केलेल्या त्याच्याकडे आज ८० विद्यार्थी असल्याचे तो अभिमानाने सांगतो. सुरुवातीला प्रशांत आणि सुरक्षारक्षकाचे काम करणारा पण उत्तम गाणारा त्रिलोक सिंगच्या सोबतीने हॉटेल, मॉल, रस्त्यावरील चौक, मित्रांच्या कार्यक्रमात स्वत:च्या बँड चा मोफत ‘शो’ तो सादर करायचो,

आता मात्र मानधन घेऊन कार्यक्रम करतो... 

गिटारच्या प्रशिक्षणानिमित्त सोडून गेलेल्या प्रेयसीचे कमबॅक..    ‘तू झिरो आहेस’ असे म्हणून मला नाकारून गेलेली ‘ती’ उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलेली असताना एक दिवस माझ्याकडे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेण्यासाठी आली. तेव्हा समजले तिलाही गिटार वादनाची आवड आहे. तिच्या मनात अजूनही झिरो आहे की हिरो हे ओळखण्याच्या भानगडीत न पडता फक्त विद्यार्थी आणि शिक्षक एवढेच नातं जपतोय...सनी पाचर्णे, गिटारवादक   

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतmusic dayसंगीत दिनartकलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण