उल्हासनगरातील भुयारी गटार योजना बंद करा, मनसेचा इशारा

By सदानंद नाईक | Updated: May 21, 2025 18:49 IST2025-05-21T18:47:32+5:302025-05-21T18:49:00+5:30

पावसाळ्यापूर्वी खडलेले रस्ते दुरस्ती करून योजनेचे काम थांबाविण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली.

Stop the underground sewerage project in Ulhasnagar, MNS warns | उल्हासनगरातील भुयारी गटार योजना बंद करा, मनसेचा इशारा

उल्हासनगरातील भुयारी गटार योजना बंद करा, मनसेचा इशारा

सदानंद नाईक, उल्हासनगर: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते मृत्युचा सापळा ठरू शकतात. पावसाळ्यापूर्वी खडलेले रस्ते दुरस्ती करून योजनेचे काम थांबाविण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली.

उल्हासनगरात ४२६ कोटीच्या भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्यासाठी शहरात सर्रासपणे रस्ते खोदण्यात येत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेले रस्ते दुरस्त करण्या ऐवजी, रस्ते खोदण्यात येत आहे. खोदलेल्या रस्त्यात पाणी साचून मोठा अपघात होण्याची शक्यता मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख, शहरप्रमुख संजय घुगे यांनी व्यक्त केली. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम तात्काळ बंद करून, रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करून अपघात टाळण्याचे आवाहन मनसेकडून महापालिकेला करण्यात आले. येतील. 

आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत, आयुक्तानी ठेकेदाराला याबाबत सूचना देण्याचे आश्वासन आयुक्तानी मनसे शिष्टमंडळाला दिले. असी माहिती बंडू देशमुख यांनी दिले. शहरातील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराने केली असून या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणीही मनसे शिष्टमंडळाने आयुक्ताना केली. तसेच भुयारी गटार योजनेच्या सल्लागाराची उचल बांगडी करण्यात यावी. अशीही मागणी करण्यात आली. मनसेच्या मागणीने भुयारी गटारीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून या ठेकेदाराला आशीर्वाद कोणाचा? असी चर्चाही सुरु झाली. शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, पदाधिकारी सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी, रवी पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Stop the underground sewerage project in Ulhasnagar, MNS warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.