शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सणांचे इव्हेंटीकरण थांबवा

By admin | Updated: October 24, 2015 04:47 IST

सणाचे पावित्र्य उरलेले नाही. ही जागा आता नाच-गाण्याने घेतली आहे. सण साजरा करणे, ही प्रथा आहे. मात्र अलीकडे सणांचे ‘इव्हेंटीकरण’ होत आहे.

हायकोर्टाचे ताशेरे : गोंगाट आटोक्यात ठेवा, नाचगाणे थांबवामुंबई : सणाचे पावित्र्य उरलेले नाही. ही जागा आता नाच-गाण्याने घेतली आहे. सण साजरा करणे, ही प्रथा आहे. मात्र अलीकडे सणांचे ‘इव्हेंटीकरण’ होत आहे. सेलीब्रिटी आणून त्यांचे शो करणे, लाऊडस्पीकर वाजवणे, हे तातडीने बंद करा. सार्वजनिक जागी सण साजरे करताना नाचगाणे थांबवा. वाहतुकीस अडथळा येतो आणि नागरिकांना नाहक त्रास होते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने छट पूजा आयोजित करण्यास परवानगी मागणाऱ्या संजय निरुपम यांच्या सांस्कृतिक मंडळाला फटकारले. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी आक्षेप घेतला. मंडळ वारंवार नियमांचे उल्लंघन करत आहे. त्याबद्दल त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मंडळाला पूजा आयोजित करण्याची परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद अ‍ॅड. नलावडे यांनी केला.खंडपीठानेही मंडळाच्या वर्तवणुकीवर बोट ठेवत चांगलेच फैलावर घेतले. ‘अलिकडे गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव सगळेच सण हे गाजावाजा करून साजरे केले जातात. सणाचे पावित्र्य हरवले आहे. सेलिब्रिटी आणून त्यांना नाचगाणे करायला लावतात. सणांचा ‘इव्हेंट’ केलाय. सगळ्यांनाच क्रेडिट हवंय, प्रसिद्धी पाहिजे. सणाचे पावित्र्य आणि शुद्धता तशीच राहू द्या, ही आम्ही सर्वांना विनंती करतो. आम्हाला सण साजरे करण्यासाठी ‘नाही’ म्हणण्याची वेळ येऊन देऊ नका. नागरिकांना त्यांच्या धर्माचे अनुसरण करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ते नाकारत नाही. त्यांनी शांतपणे आणि सौहादपूर्ण त्यांचा हक्क बजवावा. परंतु अशाप्रकारे नाचगाणे करून, अन्य नागरिकांना त्रास देऊन नव्हे,’ असे खंडपीठाने म्हटले.जुहू बीच सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी नाचगाणे करून अन्य नागरिकांना त्रास देणे योग्य नाही. लोकांनी येथे येऊन छट पूजा करावी पण आम्ही मंडळाला ती आयोजित करण्यास परवानगी देऊ शकत नाही. महापालिका आणि पोलीस येथे येणाऱ्या भाविकांची काळजी घेतील. त्यांना सुविधा पुरवतील. मंडळाने यंत्रणेला सहाय्य करावे, असे म्हणत खंडपीठाने मंडळाची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी) छट पूजेसाठी मागितली होती परवानगीकाँग्रेसचे प्रवक्ते संजय निरुपम यांच्या भारती फ्रंट या छट पूजा साजरा करणाऱ्या मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा परवानगी नाकारल्याने मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.मंडळाच्या म्हणण्यानुसार, यंदा १७ व १८ नोव्हेंबर रोजी छटपूजा आहे. छट पूजेला जुहू बीचवर सुमारे आठ ते दहा लाख भाविक जमा होतात.या भाविकांना सुरक्षा देणे, त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करणे. त्याशिवाय शौचालयांची सुविधा मंडळ पुरवते. त्यामुळे या मंडळाला छट पूजा आयोजित करण्याची मुभा द्यावी.