Karnataka Border Dispute: सीमावाद चिघळला! कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक; ६ ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:32 PM2022-12-06T13:32:47+5:302022-12-06T13:33:26+5:30

Stone pelting on Maharashtra truck on Karnataka border 6 trucks smashed : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे.

Stone pelting on Maharashtra truck on Karnataka border 6 trucks smashed | Karnataka Border Dispute: सीमावाद चिघळला! कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक; ६ ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी

Karnataka Border Dispute: सीमावाद चिघळला! कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक; ६ ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

बेळगाव-

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  

बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. 

कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या या आगळीकीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका- उदय सामंत
"कर्नाटककडून महाराष्ट्रातील ट्रकवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. कर्नाटकनं महाराष्ट्रातील जनतेचा अंत पाहू नये. अशाप्रकारच्या घटना करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना करू", असं उदय सामंत म्हणाले आहेत. 

Web Title: Stone pelting on Maharashtra truck on Karnataka border 6 trucks smashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.