मुलाच्या फुफ्फुसात अडकले होते पेनाचे टोपण, सात वर्षांनी काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 06:34 PM2017-08-16T18:34:29+5:302017-08-16T20:54:10+5:30

लहान मुले खेळताना खडू, नाणी, अन्य वस्तू  कळत न कळत तोंडात घालत असतात. पण अशा वस्तू तोंडात घालणे कधी कधी त्यांच्यासाठी जीवघेणेही ठरते. मुळच्या लातूरमधील एका मुलावर असाच प्रसंग गुदरला.

The stomach was stuck in the child's lungs, pulled out after seven years | मुलाच्या फुफ्फुसात अडकले होते पेनाचे टोपण, सात वर्षांनी काढले बाहेर

मुलाच्या फुफ्फुसात अडकले होते पेनाचे टोपण, सात वर्षांनी काढले बाहेर

Next

पुणे, दि. 16 - लहान मुले खेळताना खडू, नाणी, अन्य वस्तू  कळत न कळत तोंडात घालत असतात. पण अशा वस्तू तोंडात घालणे कधी कधी त्यांच्यासाठी जीवघेणेही ठरते. मुळच्या लातूरमधील एका मुलावर असाच प्रसंग गुदरला. लहानपणी नकळत गिळलेले पेनाचे टोपण त्याच्या फुफ्फुसात अडकले होते. अखेर सात वर्षांनंतर डॉक्टरांनी शस्रक्रिया करून हे पेनाचे टोपण बाहेर काढले आहे.  
कृष्णा उफडे असे या 16 वर्षीय मुलाचे नाव असून, तो लातूरमधील राहणारा आहे. तो चौथीत असताना त्याने नकळतपणे पेनाचे टोपण गिळले होते. हे टोपण त्याच्या फुफ्फुसात  अडकले होते. तब्बल सात वर्षे त्याला त्याचा त्रास होत होता. त्याला होत असलेल्या त्रासाचे कारण शोधण्यासाठी कुटुंबीयांनी पुणे, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर येथील विविध रुग्णालयात त्याची तपासणी केली. शेकडो चाचण्या, सीटीस्कॅन झाले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पाच लाखांहून अधिक रक्कम खर्च केली. पण त्याला होत असलेल्या वेदनेचे योग्य निदान होत नव्हते. 
अखेर 11 ऑगस्ट रोजी जहाँगीर रुग्णालयात त्याच्या समस्येचे योग्य निदान झाले. ब्रॉस्कोस्कोप नावाच्या उपकरणाने त्याच्या फुफ्फुसत अडकलेल्या वस्तूचा शोध घेण्यात आला ती बाहेर काढण्यात आली. त्यानंतर डॉ. संजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार करून त्याला सोमवारी रुगालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  
  कृष्णावर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती देताना जहाँगीर रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट असलेले डॉ. संजीव जाधव म्हणाले," मी त्याला त्याच्या आजारपणाविषयी आणि होणाऱ्या त्रासाविषयी विचारले असता त्याने आपल्याला  इयत्ता चौथीत असल्यापासून त्रास होत असल्याचे सांगितले. पण त्यावेळी आपल्या पोटात दुखायचे असे तो म्हणाला. त्यानंतर आम्ही त्याच्या विविध चाचण्या घेतल्या. त्यात त्याच्या फुफ्फुसामध्ये पेनाचे टोपण अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ब्रॉस्कोस्कोपीद्वारे हे टोपण बाहेर काढण्यात आले.    
 रुग्णालयातील ब्रॉस्कोस्कोपिस्ट डॉ. महेंद्र कावेडिया यांनी सांगितले की, " टोपण अडकल्याने कृष्णा उफडेच्या फुफ्फुसाचा एक भाग पूर्णपणे बंद झाला होता. पेनाचे टोपण फुफ्फुसाच्या आतील भागातून बाहेर काढणे कठीण होते. पण अथक प्रयत्नांनंतर ते बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे कृष्णाची आरोग्याच्या संभाव्य धोक्यांपासून सुटका झाली."  त्याच्या फुफ्फुसामध्ये पू साठला होता. तोही बाहेर काढण्यात आला असेही त्यांनी पुढे सांगितले.  
 
एकाने गिळला खिळा, दुसरीने सेल

खेळता खेळता सात वर्षीय मुलाने खिळा गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून ग्रामस्थांनी त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, खिळा बाहेर येण्याऐवजी मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन फसला. अशीच वेळ तीन वर्षांच्या चिमुकलीवर ओढवली. घरात पडलेला संगणकाचा सेल तिने गिळला. तोही अन्ननलिकेजवळ फसल्याने ती चिमुकलीही अत्यवस्थ झाली. या दोन्ही घटनेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात विना शस्त्रक्रियेने या दोन्ही वस्तू बाहेर काढल्या. दोन्ही चिमुकल्यांना जीवदान मिळाले. हिमांशु शैलेश क्षीरसागर (७ वर्षे) आणि परी रामदास भोंडे (३ वर्षे) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातल्या बोपेसर येथे वास्तव्य करणारे शैलेश क्षीरसागर हे केशकर्तनालय चालवतात. त्यांचा सात वर्षांच्या मुलगा हिमांशुने गुरुवारी खिळा गिळला. त्याला तत्काळ मेडिकलमध्ये आणले. अपघात विभागातून त्याला ‘सुपर’मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथे काढण्यात आलेल्या ‘एक्स-रे’मध्ये पोटात खिळा असल्याचे निदान झाले. हिमांशुच्या पोटात फसलेला खिळा ‘ड्युडनल थर्ड पार्ट’ म्हणजे जिथून छोट्या आतड्यांना सुरुवात होते, तिथे फसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. खिळा अणकुचीदार असल्याने तो बाहेर काढताना आतड्याना इाजा होण्याची जोखीम होती. त्यामुळे प्रथम त्याच्या आतड्यात फसलेला खिळा पोटापर्यंत आणणे आवश्यक होते. ही बाब हेरून डॉ. सुधीर गुप्ता यांनी शनिवारी उपचार करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी डॉक्टरांच्या बºयाच प्रयत्नानंतर ‘डबल बलून एन्डोस्कोप’च्या मदतीने चार इंचाचा खिळा कुठलीही दुखापत न करता बाहेर काढला.

Web Title: The stomach was stuck in the child's lungs, pulled out after seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.