रुग्णाच्या पोटातून काढली ८० नाणी अन् ३५ खिळे

By Admin | Published: April 18, 2015 12:19 AM2015-04-18T00:19:08+5:302015-04-18T00:19:08+5:30

पोट दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या रुग्णाच्या पोटात तब्बल ८० नाणी आणि ३५ खिळे होते.

80 pounds and 35 nails removed from the patient's stomach | रुग्णाच्या पोटातून काढली ८० नाणी अन् ३५ खिळे

रुग्णाच्या पोटातून काढली ८० नाणी अन् ३५ खिळे

googlenewsNext

चंदीगढ : पोट दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या रुग्णाच्या पोटात तब्बल ८० नाणी आणि ३५ खिळे होते. दोन-तीन वर्षांपासून हे धातू त्याच्या पोटात होते यावर विश्वास बसू नये परंतु डॉक्टरांनी एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून ८० नाणी व ३५ खिळे बाहेर काढून त्याची त्या दुखण्यातून सुटका केली.
राजपाल सिंह (३४, रा. रामपुरा, फाजिल्का) गेल्या तीन वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होता. त्याने लुधियाना, चंदीगढसह अनेक शहरांत तपासणी करून घेतली होती. परंतु त्यात ही बाब समोर आलीच नाही. १४ एप्रिलला राजपालचे पोट खूपच दुखू लागल्यामुळे कुटुंबियांनी त्याला भटिंडातील गगन गॅस्ट्रो हॉस्पिटलमध्ये दाखविले. डॉ. गगनदीप गोयल यांनी एंडोस्कोपी केली. तीत पोटात काही लोह धातू असल्याचे सांगितले व एक नाणेही पोटातून बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी गोयल यांच्यासह पाच डॉक्टरांनी पुन्हा राजपालची एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून पोटातून जवळपास ८० नाणी व ३५ खिळे बाहेर काढले. नाणी व खिळे काळे पडलेले होते.
 

Web Title: 80 pounds and 35 nails removed from the patient's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.