शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजस ठाकरेंमध्ये...; नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:47 IST

जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. 

संजय राऊत यांनी आज दोघांमध्ये भांडणे होतात का पाहणे, फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती असल्याची टीका केली होती. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्यूत्तर दिले आहे. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. 

ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या आणि भांडणं लावत होतात, त्याचमुळे तुम्हाला फिरायला दिले नाही. पवार घराण्यामध्ये तुम्ही काय काड्या लावल्यात ही माहिती महाराष्ट्राला दिली तर कुणी तुम्हाला घरात देखील उभे करणार नाही. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतेय, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा वापरताना तुम्हाला लाज वाटली नाही का? आजकाल तुमचा पगार 10 जनपथवरून येतोय, वेणूगोपाल धूत यांच्याकडून किती पगार येतो असा सवाल करत माहिती खोटी असेल तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगा पगार येत नाही म्हणून असे आव्हानही राणे यांनी दिले. 

महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत जे काही पवार साहेबांचे कास्ट सर्टिफिकेट फिरत आहे ते नागपूरवरून आलेय, भाजपचे षडयंत्र आहे. भाजपवर आरोप करण्याअगोदर संजय राऊतच्या मांडीवर मांडी लावून बसताय त्यांना आधी विचारा सुजित पाटकर त्याचा मानसपुत्र, त्याला खोटे SC सर्टिफिकेट कोणी काढून दिले, असेही राणे म्हणाले. 

रोहित पवारांवर टीका करताना राणे यांनी आजकाल राज्यात चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आलाय, असे सांगितले. त्याला अजित पवारांच्या चेहऱ्यावर काय लिहिलेय, फडणवीस कुणाच्या मागे आहेत या सर्वच बाबतीत भविष्यवाणी करत आहे. तो म्हणजे ओसाड गावाचा पाटील रोहित पवार असे म्हणत स्वतःच्या मतदारसंघाच्या मतदारांचा कधी चेहरा वाचायला त्यांना जमले नाही, वेळ मिळाला नाही, असा टोला लगावला. ओसाड गावच्या पाटलाने स्वतःच्या मतदार संघातील लोकांचे चेहरे वाचावेत नाहीतर 2024ला तुमचा बाजार उठणार हे निश्चित झालेय, असा इशारा राणे यांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाRohit Pawarरोहित पवार