शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुकाणू समिती पुन्हा आक्रमक, राज्यभरात आज चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 12:50 IST

मुंबई, दि. 14 -  शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा दिली ...

मुंबई, दि. 14 -  शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा दिली आहे.  ‘प्रहार’ व ‘जय जवान, जय किसान’ या दोन्ही संघटनांनीही एकत्र येत आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे.  त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 

वर्धा : शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणासाठी प्रहार संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. भुगाव टी पॉईंटजवळ हे आंदोलन करण्यात आले. हिंगोली :  कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे रास्तारोको सुरू आहे. नांदेड ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर हे गाव असल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

बीड : परळी-बीड मार्गावर तेलगाव व  गेवराई-बीड या महामार्गावर पाडळसिंगR येथे शेतक-यांचा सकाळपासूनच रास्ता रोको सुरू असल्याने वाहतूक खोळंबली आहे. गेवराई तालुक्यात सुकाणू  समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जातेगांव फाटा, पाडळसिंग, चकलांबा व  कोळगाव येथे जक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे  100 बैलगाड्यासह शेतकरी रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जळगाव : सोमवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र किसान सभेतर्फे अमळनेर येथे धुळे रस्त्यावर  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची होळी केली. विशेष म्हणजे खबरदारी घेत आंदोलकांनी शांतेत आंदोलन पार पाडले.  

शेलपिंपळगाव : शेलगाव (ता.खेड) येथे चाकण-शिक्रापूर राज्य महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

परभणी 

यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये शेतक-यांचा चक्काजाम

दरम्यान,  सुकाणू समितीचे सदस्य आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात ‘जय जवान, जय किसान’च्या कार्यालयात बैठक झाली. यात ‘जय जवान, जय किसान’चे संयोजक प्रशांत पवार यांच्यासह अविनाश शेरेकर, विजय शिंदे, अरुण वनकर, रमेश कारेमोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांकडून आंदोलन दडपण्याची शक्यता विचारात घेता आंदोलनाची वेळ व स्थळ जाहीर करणे टाळण्यात आले. या वेळी आ. कडू म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकºयांची फसवणूक करणार आहे. कर्जमाफी देताना लादलेल्या अटी जाचक व अपमानास्पद आहे. अधिवेशनात आमदारांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले. शेतक-यांच्या संघटनांनी आंदोलने केली. मराठा मोर्चातही शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांची दखल घेतलेली नाही. यावर विचार करून सुकाणू समितीने पुन्हा आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे. प्रशांत पवार म्हणाले, शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करायला लावणे हे फसवे धोरण आहे. शेतक-यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.सेवाग्राम ते गडचिरोली संघर्षयात्राप्रहार व जय जवान जय किसान या दोन्ही संघटना एकत्र येत सेवाग्रम ते गडचिरोली संघर्षयात्रा काढणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन शेतक-यांमध्ये जनजागृती केली जाईल. या यात्रेचा कार्यक्रम आखण्यासाठी तीन दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल, असे बैठकीत ठरले.