लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समाजातील प्रतिष्ठित घरातील मुलगा... राष्ट्रीय कराटेपटू म्हणून त्याने ओळख निर्माण केली; परंतु झटपट पैसे कमाविण्याच्या नादात समाजातील प्रतिष्ठा तो विसरला आणि ऐषोआरामासाठी त्याने मित्राच्या साथीने दुचाकी चोरण्याचा गैरमार्ग अवलंबला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सिव्हिल लाइन पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी रविवारी दोन युवकांना अटक केली. श्रेयश सुरेश ठाकरे (२०) आणि अक्षय मनोज मसने (१९) अशी त्यांची नावे आहेत. श्रेयश हा प्रतिष्ठित घरातील मुलगा असून, तो राष्ट्रीय कराटेपटू आहे. झटपट पैसा कमाविण्याच्या लालसेने श्रेयशला दुचाकीचोर बनविले़
मित्राच्या साथीने चोरल्या दुचाकी
By admin | Updated: July 17, 2017 01:59 IST