शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अंबाबाई देवी मूर्तीचे ऑगस्टअखेर संवर्धन

By admin | Updated: June 10, 2015 01:46 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मूर्तीची पाहणी करणार आहेत. अंबाबाईच्या मूर्तीवर वज्रलेप करावा की करू नये, या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. श्रीपूजकांच्या पुढाकाराने हा खटला वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग होऊन काही महिन्यांपूर्वीच ‘केमिकल कॉन्झर्वेशन’वर एकमत होऊन विषय निकाली निघाला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे गेला. मात्र, त्यावर केंद्राकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद न मिळाल्याने विषय रखडला होता.गेल्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीसाठी आलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांना श्रीपूजक मंडळाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. शहा यांनी तातडीने त्याचा पाठपुरावा केला. औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून श्रीपूजक मंडळाशी संपर्क साधून आदेशाची माहिती दिली. ‘केमिकल कॉन्झर्वेशन’चा खर्च देवस्थान समिती व धार्मिक विधींचा खर्च श्रीपूजकांनी करायचा, असे निकालात नमूद आहे. (प्रतिनिधी)सप्टेंबरमध्ये त्रिशताब्दीअंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधीच म्हणजे आॅगस्टमध्ये मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने महोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.