शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रोहित पवारांच्या ED चौकशीविरोधात सर्व सरकारी कार्यालयासमोर NCP करणार घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 18:40 IST

आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं माजी आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं.  

मुंबई - Rohit Pawar ED Enquiry ( Marathi Newsराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची १ फेब्रुवारी रोजी ईडी कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घंटानाद करण्यात येणार आहे.  मागील चौकशीत ईडीनं १० तास रोहित पवारांना बसवून ठेवले. त्यानंतर आता पुन्हा १ फेब्रुवारीला चौकशी होत आहे. त्यामुळे रोहित पवारांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आणि घंटानाद आंदोलन करण्यात येणार अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी दिली आहे. 

विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असताना देखील नोटिसा बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर लोकशाही असेल आणि हुकूमशाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने जाहीर केली नसेल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं त्यांनी म्हटलं.  

तसेच विरोधात असणाऱ्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येते मात्र नंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेल्या यामिनी जाधव, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी या लोकांच्या चौकशीच काय झालं. यामध्ये २० ते २२ जणांची मोठी यादी आहे. या सर्व चौकशा थंड का पडल्या आहेत?. या सर्वांनी भाजपासमोर गुडघे  टेकल्यामुळे आणि सत्तेसोबत गेल्यानं यांच्या चौकशी बंद झालेली आहे. भाजपासोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी जर यांनी भ्रष्टाचार केला होता. तर मग या भ्रष्टाचारी फौजेला मोदी सरकारने आपल्या छत्र छायेत घेतल्यामुळे यांच्या चौकशी बंद झाल्या आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार रोहित दादा पवार भाजपच्या समोर गुडघे टेकत नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. 

दरम्यान, रोहित पवार यांची ईडी कडून करण्यात येत असलेली चौकशी हास्यास्पद व निंदनीय आहे. ही चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. रोहित पवार बेरोजगारीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा-धनगर-लिंगायत यांच्यासाठीचं आरक्षण यांवर आवाज उठवत असल्याने सरकार अडचणीत येत आहे. रोहितदादा हे अजित पवार मित्रमंडळासोबत गेले असते तर ही चौकशी लागली नसती हे त्रिकालबाधित सत्य आहे.  रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर बाहेर येईपर्यंत अन्नत्याग करणार आहोत असं प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार