राज्याच्या परिवहन विभागाला ८५ वर्षांनंतर मिळणार स्वत:ची इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:35 IST2025-03-01T17:31:14+5:302025-03-01T17:35:57+5:30

परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल ८५ वर्षे या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते.

State transport department to get its own building after 85 years Bhumi Pujan tomorrow at the hands of Cm devendra fadnavis | राज्याच्या परिवहन विभागाला ८५ वर्षांनंतर मिळणार स्वत:ची इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

राज्याच्या परिवहन विभागाला ८५ वर्षांनंतर मिळणार स्वत:ची इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

Maharashtra Government: परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे १ मार्च हा दिवस ‘परिवहन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मजली प्रशस्त अशा ‘परिवहन भवन’ या इमारतीचे भूमिपूजन संपन्न होत आहे. सुमारे १२,८०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतःची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल ८५ वर्षे या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प मांडला आणि त्यानंतर कार्यवाही सुरू झाली. अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘परिवहन भवन’ या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भूमिपूजन होत आहे.

Web Title: State transport department to get its own building after 85 years Bhumi Pujan tomorrow at the hands of Cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.