शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

राज्यातील 'ह्या' विमानतळांवर बनणार अत्याधुनिक पार्किंग केंद्रे ; १०,००० नव्या रोजगारांची होणार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:11 IST

शिर्डी, बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर, नांदेड विमानतळ : कनेक्टिव्हिटीला नवे बळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम नुकताच हाती घेतला आहे. शिर्डी, बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर, नांदेड येथील विमानतळांना अत्याधुनिक 'विमान पार्किंग केंद्रां' मध्ये विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्यातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला नवे बळ आणि विमान वाहतुकीच्या पायाभूत सुविधांना ऐतिहासिक चालना मिळेल.

'विमान पार्किंग हब', नव्या युगाची सुरुवात

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या विमानतळांवर केवळ प्रवासी उड्डाणेच नव्हे तर विमान पार्किंग, मेंटेनन्स, रिपेअर आणि सव्हिसिंग (एमआरओ) यांसाठी सुसज्ज केंद्रे उभारली जाणार आहेत. सध्या मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये विमान पार्किंगची प्रचंड कमतरता असल्याने या प्रकल्पामुळे राज्यातील हवाई व्यवस्थापन अधिक सुकर आणि किफायतशीर होणार आहे.

प्रादेशिक विकासाला नवी दिशा

या उपक्रमामुळे केवळ विमान वाहतुकीतच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही नवी गती मिळेल. शिर्डी, नांदेड आणि लातूरसारख्या ठिकाणी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय दूरगामी ठरणार आहे. यवतमाळ आणि धाराशिवमधील पायाभूत सुविधा विकसित झाल्यास विदर्भ आणि मराठवाड्याला नवीन आर्थिक संजीवनी मिळेल.

१०,००० नव्या रोजगारांची होणार निर्मिती 

  • या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विमान तंत्रज्ञ, अभियंते, ग्राउंड स्टाफ, लॉजिस्टिक कर्मचारी आणि सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल. हा प्रकल्प ग्रामीण आणि प्रादेशिक भागांना नव्या रोजगाराची दिशा देईल.
  • या विमानतळांवर नवीन टर्मिनल इमारती, हँगर, 3 इंथन साठवण केंद्रे, कार्गो सुविधा आणि हवाई २ वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारल्या जातील. या सर्व सुधारणा नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मानकांनुसार केल्या जाणार असून, प्रकल्पासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Airports to Get Upgraded Parking Hubs, Creating 10,000 Jobs

Web Summary : Maharashtra plans to upgrade airports into aircraft parking hubs, boosting connectivity and creating 10,000 jobs. Airports will feature maintenance, repair, and overhauling facilities. This initiative will improve air management, stimulate the economy, and foster regional development through infrastructure improvements.
टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रAirportविमानतळ