शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 15:53 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी...

मुंबई -  आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी केला.  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी बैठक बोलावली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला  अजित पवार, छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले, "आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाज चर्चेला तयार नाही. मात्र समाजातील काही घटकांना घेऊन चर्चा करायची आणि चळवळीत फूट पाडायची ही सरकारची रणनीती शेतकरी आंदोलनाच्या वेळीही दिसून आली होती."  आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागासवर्गीय आयोगाला निवेदन देण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी . गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण , दिलीप सोपल, नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 आमदार उपस्थित होते.  

धनंजय मुंडे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे- सकल मराठा समाजाचे मागणी ते आरक्षण त्वरित मिळावे म्हणून राष्ट्रवादी नेते मागासवर्गीय आयोगाकडे निवेदन देणार- हे आरक्षण लवकर मिळाले पाहिजे. - त्याबरोबर नोकरभरतील 16 % जागा राखीव ठेवल्या पाहिजे- मुख्यमंत्री म्हणाले गुन्हे मागे घेऊ पण पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन थांबले नाही - 18 तारखेला मी सभागृहात बोललो होतो आता ठोक मोर्चे निघत आहे - सरकार बघ्याची भूमिका घेत आहे - गुजरात मध्ये पटेलांचे आंदोलन हाणून पाडलं,त्याच पद्धतीने सरकरच्या वतीने प्रयत्न करत आहे  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtraमहाराष्ट्र