शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणावर राज्य सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:18 IST

Reservation: राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतही आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली असून, सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. 

मुंबई : राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतही आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली असून, सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, पदोन्नतीत आरक्षण देणारा कायदा राज्य शासनाने केला होता. सध्या त्या संबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून, त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी राज्य शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.दरम्यान मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना २०२३ पर्यंत राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यासाठीच्या १३.७० कोटींच्या खर्चास मान्यता दिली. मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने सामाजिक न्याय विभागाकडून योजना राबविली जाणार आहे.  

सहकारी संस्थांच्या सदस्यांना संरक्षण२४ मार्च, २०२० ते ०९ जुलै, २०२० या कालावधीसाठी शासनाने ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्यात आल्या, त्या संस्थांच्या समिती सदस्यांना नियमित सदस्य असल्याचे संरक्षण देण्यासाठी ही सुधारणा केली जाईल. अध्यापकांना निवृत्ती लाभ-अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट, तसेच सेट अध्यापकांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.  - २३ ऑक्टोबर, १९९२  ते ३ एप्रिल, २००० या कालावधीत नियुक्त अध्यापकांना निवृत्तीवेतन देण्यात येईल. मूळ नियुक्तीचा दिनांक गृहीत धरून सेवानिवृत्ती वेतन देण्यात येईल.कलाकारांना अर्थसाहाय्य - प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २८ कोटी रुपये व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ८४७ संस्थांना ६ कोटी रुपये असे एकूण ३४  कोटी रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.  nस्थानिक लोककलावंतांची निवड वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येणार आहे.  

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार