The state does not operate on Twitter Kesarkar attacks Rane | ट्विटरवरून राज्य चालत नसते; केसरकरांचा नितेश राणेंना टोला
ट्विटरवरून राज्य चालत नसते; केसरकरांचा नितेश राणेंना टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे शिवसेना व उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या टीकेला माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. ट्विटरवर राज्य चालते असा गैरसमज करून घेऊ नये, असा खोचक टोला त्यांनी नितेश राणेंना लगावला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.

यावेळी केसरकर यांनी सांगितले. कोकणातील मंदिरांची कामे रद्द केली त्यावर नीतेश राणे यांनी ट्विट केले होते. त्यावरही केसरकर यांनी जोरदार टीका केली. काही जणांना वाटते की बैलगाडी जी चालली आहे. ती मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते पण तो भ्रम असतो. त्यामुळे कोणाच्या ट्विटमुळे राज्यात निर्णय होत नसल्याचा टोलाही केसरकर यांनी राणे यांना लगावला.

तसेच सिंधुदुर्गमधील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. फक्त नवीन सरकार आल्यावर पूर्ण सरकारच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून तसेच सध्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले गेले पाहिजे हे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय घेतले आहे. जी कामे सुरू आहेत. ती कामे सुरू रहातील पण काही कामे अद्याप सुरू नसल्याचे केसरकर म्हणाले.

यावेळी केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या सुद्धा समाचार घेतला. मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी दीपक केसरकर यांनी लगावला.

Web Title:  The state does not operate on Twitter Kesarkar attacks Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.