शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाची चाचपणी; अंतिम निर्णयासाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 12:46 IST

विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

ठळक मुद्देपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य शासन अद्यापही ठाम

पुणे : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटीबाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली असून, याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावार्मुळे राज्य शासनाने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तसेच एमएचटी-सीईटीवरही अद्याप निर्णय झालेला नाही. सीईटी सेलच्या आयुक्तांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करण्याबाबतही तळ्यात-मळ्यात असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे.लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना व दुरूस्त्या मागविण्यात आल्या आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात या परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून सूचना मागविल्या जातात. या वषीर्ही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे. पण यंदा कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे. 

राज्य शासन कोंडीतपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य शासन अद्यापही ठाम आहे. तर दुसरीकडे सीईटी तसेच पुरवणी परीक्षांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या परीक्षा घ्यायचे झाल्यास पदवीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय वादात सापडू शकतो. पुरवणी परीक्षा न घेतल्यास एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे वर्ष वाया जाऊ शकते. तर सीईटी न झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांना बारावीच्या गुणांवर प्रवेश द्यावा लागेल. पण अनेक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेऐवजी सीईटीचाच कसून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या स्पर्धेत फटका बसू शकतो.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीexamपरीक्षाState Governmentराज्य सरकार