शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

By admin | Updated: July 23, 2015 01:15 IST

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खंडाळा बोरघाटामध्ये धोकादायक झालेल्या दरडी तसेच सुटे दगड काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली.

अमोल पाटील , खालापूरपुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खंडाळा बोरघाटामध्ये धोकादायक झालेल्या दरडी तसेच सुटे दगड काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. दरड कोसळण्याच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर स्पायडर केबल नेटचे जाळे पसरविले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व उपक्र म मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.खंडाळा बोरघाटामध्ये उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या स्विस कंपनीच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले असून, एकूण ८ धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी दगड तसेच डोंगरांचे धोकादायक भाग पाडण्यात येणार आहेत. तसेच मोठ्यात मोठे दगड मार्गावर येण्यापासून रोखण्यासाठी स्पायडर केबल नेटसारखी अत्यंत मजबूत जाळी संपूर्ण मार्गाच्या कडेने डोंगरावर लावण्यात येणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गुरु वारपासून जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात येणार असून कोणत्या ठिकाणी जाळी आवश्यक आहे, या काळात वाहतुकीचे नियोजन कसे करता येईल, याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले, पुणे व रायगड जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, एमएसआरडीसी तसेच आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.