शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

पुढील तीन दिवस पाऊस, परतीच्या महिन्याचा प्रारंभ मुसळधारेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:52 IST

पुढील तीन दिवस पाऊस राज्यभर सक्रिय; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर अधिक राहणार

मुंबई : मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुढील २ ते ३ दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील. गुरुवारनंतर मात्र मान्सूनचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत चांगला पाऊस झाला. विदर्भाच्या काही भागांत मध्यम सरी बरसल्या. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत हवामान कोरडे होते. पुढील २४ ते ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस पडतच राहील.

रत्नागिरी, महाबळेश्वरमध्ये मध्यम ते मुसळधारगेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस झाला असून, पुढील २४ तासांतही कोकण आणि गोव्यातील काही भागांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. २४ तासांत रत्नागिरी, मुंबई, डहाणू, हर्णे, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.सखल भागांत साचले पाणीमुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे हिंदमाता, सायन येथील प्रतीक्षानगर, अ‍ॅन्टॉप हिल, माटुंगा येथील गांधी मार्केट, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, चेंबूर येथील शेल कॉलनी, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेंबी ब्रीज, देवनार कॉलनी, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते.हवाईसेवा विस्कळीतमुंबई व परिसरात मंगळवारी कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा व कमी दृश्यमानतेचा फटका हवाई वाहतुकीला बसला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या व या विमानतळावर उतरणाºया विमानांना काही काळ विलंब झाला.लोकल सेवेला फटकापूर्व आणि पश्चिम उपनगरात मंगळवारी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने याचा फटका लोकल सेवेला बसला. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल फेºया १० ते १५ मिनिटे तर पश्चिम मार्गावरील लोकल फेºया ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा उशीर झाल्याची नाराजी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी व्यक्त केली.रायगडमध्ये १,१३४ मि.मी. पाऊसअलिबाग : गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तब्बल एक हजार १३४ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ऐन गणेशोत्सवात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सार्वजनिक गणेश मंडळांना बसला आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजन पडल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहाययला मिळाले.ठाण्यात सर्वाधिकसोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, अलिबाग १३३ मिमी, सांताक्रुझ १३१ मिमी, हर्णेमध्ये ९४ मिमी आणि कुलाबामध्ये ८० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.नवी मुंबईतही जोरदारनवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी संपूर्ण दिवसभरात सरासरी २७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पावसाची नोंद नेरुळमध्ये झाली. पावसामुळे जागोजागी पाणी सचले. सुदैवाने झाडे पडल्याची अथवा इतर दुर्घटना घडलेली नाही. मंगळवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी २७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात नेरुळ विभागात ४२.५० मि.मी., बेलापूर ३७ मि.मी., वाशी २०.५० मि.मी, तर ऐरोलीत १० मि.मी. पावसाची नोंद झाली.भिवंडीत पुराच्या पाण्यात वृद्ध वाहून गेलाठाणे : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पाऊस मंगळवारी दिवसभर जोरदार हजेरी लावली. या पावसादरम्यान दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पाये येथील नाईकपाड्यामधील वृद्ध शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या भक्तांचीही यामुळे त्रेधातिपिट उडाली.भिवंडीच्या नाईकपाडा येथील ६२ वर्षीय लक्ष्मण लाडक्या सफीस हा शेतकरी दुपारी शेतातून घरी येत असताना शेताच्या बांधापासून वाहत जाणाºया नाला ओलांडत असताना तोल जावून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे येथील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. याशिवाय दुपारच्या वेळी पोखरण रोड, डॉ. आंबेडकर चौक येथे लावलेल्या होर्डिंग्जला शॉक लागत असल्याची तक्रार आली. तर गायमुख जवळ घोडबंदर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याशिवाय मनोरुग्णालयाजवळी मोठा वृक्ष उन्मळून पडला तर पाचपाखाडी येथील एक झाड धोकादायक स्थितीत आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३८८.४०मिमी पाऊस पडला. सरासरी ५५.४९ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक १४१ मिमी. तर कल्याणला ४३.४०, मुरबाडला ४ मिमी, उल्हासनगरला ८३, अंबरनाथला ५२, भिवंडीला ५५ आणि शहापूर तालुक्यात १० मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र