शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 9:45 PM

नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देगुरुवार पासून आॅनलाईन नोंदणी : वेळापत्रक प्रसिध्द १८ जूनपर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये नोंदणी शुल्क भरावे लागणार आॅनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती दि. ७ ते १९ जून या कालावधीत

पुणे : वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून प्रसिध्द करण्यात आले. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुरूवार (दि.७) पासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. वैद्यकीयसाठी दि. १७ तर अभियांत्रिकीसाठी दि. १९ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष असते. त्यानुसार दोन्ही अभ्यासक्रमांची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू करण्याचा निर्णय कक्षाने घेतला असून आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळाच्या लिंक सुरू होतील. वैद्यकीयसाठी आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. ७ ते १७ जून या कालावधीत सुरू असेल. दि. १८ जूनपर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर दि. १९ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतर पसंती क्रम अर्ज भरणे, पहिल्या फेरीची निवड यादी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश अशी प्रक्रिया असेल. कक्षाकडून पहिल्या फेरीपर्यंतचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. १ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील.अभियांत्रिकी प्रवेशाचे तीन फेऱ्यांपर्यंतचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. आॅनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती दि. ७ ते १९ जून या कालावधीत होईल. पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी दि. २१ जूनला तर अंतिम गुणवत्ता यादी २४ जूनला जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंती क्रम भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू होईल. तीन फेऱ्यांपर्यंतची प्रक्रिया दि. २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर तसेच आवश्यक माहिती सीईटी कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. --------------------वैद्यकीय प्रवेशची कागदपत्रे पडताळणीसाठी केंद्र -१. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भायखळा, मुंबई२. आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी, मुंबई३. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे४. शासकीय वैद्यकीय महाविद्याय, नागपुर५. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपुर६. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद७. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड८. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबादवैद्यकीय प्रवेशासाठी संकेतस्थळ -

...........................

2.वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रकआॅनलाईन नोंदणी व अर्ज भरणे - दि. ७ ते १७ जूननोंदणी शुल्क भरण्याची अंतिम मुदत - दि. १८ जूनतात्पुरती गुणवत्ता यादी - दि. १९ जून (सायंकाळी ५ वाजेनंतर)कागदपत्रांची पडताळणी - दि. २१ ते २५ जूनसुधारित तात्पुरती गुणवत्ता यादी - दि. २६ जूनआॅनलाईन पसंती क्रम अर्ज भरणे - दि. २६ ते २९ जूनपहिल्या फेरीची निवड यादी प्रसिध्द करणे - दि. २ जुलैपहिल्या फेरीनुसार महाविद्यालयात प्रवेश घेणे - दि. १२ जुलैपर्यंत-----------------------वैद्यकीय प्रवेसासाठी अर्ज भरताना त्यामध्ये केवळ ‘नीट आॅल इंडिया रँक’ नमुद करावा लागेल. बँकेमध्ये चलन भरल्याशिवाय आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीवेळी ही सर्व कागदपत्रे संबंधित केंद्रावर दाखवाली लागतील.-----------अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक -आॅनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती - दि. ७ ते १९ जूनतात्पुरती गुणवत्ता यादी - दि. २१ जूनयादीवर हरकती - दि. २२ व २३ जूनअंतिम गुणवत्ता यादी व पहिल्या फेरीसाठी जागांची स्थिती - दि. २४ जूनआॅनलाईन पसंती क्रम - दि. २५ ते २८ जूनकॅप १ ची निवड यादी - दि. २९ जूनएआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. ३० जून ते ४ जुलैदुसºया फेरीसाठी रिक्त जागा - दि. ५ जूलैआॅनलाईन पसंती क्रम - दि. ६ ते ८ जुलैकॅप २ निवड यादी - दि. ९ जुलैएआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. १० ते १२ जुलैकॅप ३ साठी रिक्त जागा - दि. १३ जुलैआॅनलाईन पसंती क्रम - दि. १४ ते १६ जुलैकॅप ३ निवड यादी - दि. १७ जुलैएआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. १८ ते २० जुलै

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिकonlineऑनलाइन