शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी २५ नवीन एसी बसेस घेणार

By admin | Updated: June 2, 2014 06:43 IST

येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या एसी बसेसची दुरवस्था झालेली असताना आणि त्यात सुधारणा न करताच प्रवाशांच्या दिमतीला दिल्या जात असतानाच येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाने रविवारी ६६ वा वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी बसेस आहेत. यातील २५ बसेसची तीन वर्षांची मुदत असून, ती कधीच संपली आहे. या बसचे कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्या कंत्राटदारांना त्यांचे कंत्राट वाढवून मिळत नव्हते. त्यामुळे त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत या २५ बसेस वार्‍यावर सोडण्याचे काम कंत्राटदारांकडून करण्यात आले आणि या बसेसची अवस्था खूपच बिकट झाली. या बसमध्ये दुरुस्ती आणि बदल करून त्या पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेत त्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महामंडळाकडून याव्यतिरिक्त १0 नवीन एसी बसेस घेतल्या जाणार होत्या. हा निर्णयही मागे पडला. रविवारी एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे, एसटी व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेले व्ही. एन. मोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसी व्होल्वो बसची स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आम्ही याचा आढावा घेतला असून, त्यात सुधारणा केल्या आहेत. तसेच ज्या कंत्राटदारांकडे या बसेसचे काम आहे त्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. हे सांगतानाच राज्य शासनाकडून थकबाकी मिळाल्यास येत्या काही महिन्यांत आणखी २५ नवीन एसी बसेस विकत घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र या बसेस कधी ताफ्यात येतील, हे काहीच सांगू शकले नाहीत. सध्या ताफ्यात असलेल्या एसी बसचे कंत्राट हे एक वर्ष आणखी वाढवल्याने नवीन एसी बसेसची घोषणा ही फक्त घोषणाच राहील की त्याची अंमलबजावणी होईल, हे पाहण्यासारखे असेल. प्रसारमाध्यमे टार्गेट एसटीच्या वर्धापन दिनात या वेळी प्रसारमाध्यमांना एसटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून टार्गेट करण्यात आले. परदेश दौरा, एसी बसेसची नादुरुस्ती याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्याने आपला रोष या वेळी पत्रकारांवर काढण्यात आला. तब्बल दीड तास चाललेल्या कार्यक्रमात आणि त्यानंतर एक तास झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांवर फक्त टीकाच करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पत्रकारांना बोलावून त्यांच्यावर टीका करण्यात आल्याने पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.