शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज; राज्यभरातील आगारातून दररोज सोडणार एक हजार जादा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 09:35 IST

ST Bus News: दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ST Bus पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक हजार गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. Anil Parab यांनी दिली.

मुंबई : दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक हजार गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.परब म्हणाले,  दिवाळीच्या सुट्टीत प्रवासी महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांना भेट देतात, तर अनेक जण आपापल्या गावी जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारांतून दररोज सुमारे एक हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत  या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. गेल्या वर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा सुट्ट्यांमुळे  प्रवाशांची होणारी गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश मंत्री ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :state transportएसटीAnil Parabअनिल परबMaharashtraमहाराष्ट्र