शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

एसटीची रातराणी देणार खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 06:00 IST

आसनी व स्लीपर अशा दोन्ही सुविधा असलेली बस पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात येणार आहे.

ठळक मुद्देआसनी व शयनयान सुविधा : पहिल्यांदाच २०० बस येणार ताफ्यातआसनी तसेच स्लीपर या दोन्ही श्रेणीतील अनुक्रमे ९३९ व ९० बस राज्यातील विविध मार्गांवर प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्यांना पसंती रातराणीची भर पडणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणारखासगी ट्रव्हल्सकडून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या तुलनेत सुमारे दीड पट जादा तिकीट

- राजानंद मोरे-  पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) च्या ताफ्यात लवकरच रातराणी ही विशेष बस दाखल होणार आहे. आसनी तसेच शयनयान (स्लीपर) या दोन्ही सुविधा या बसमध्ये असून पहिल्यांदाच एसटीच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे शिवनेरी, शिवशाही पाठोपाठ आता रातराणीही खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडे वाढलेला प्रवाशांचा ओढा कमी करण्यासाठी एसटीकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत. सध्या एसटीकडे स्लीपर व आसनी सुविधा असलेल्या शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही या स्वतंत्र बस आहेत. आता या दोन्ही सुविधा एकाच बसमध्ये असतील. त्यानुसार एसटीने अशाप्रकारच्या २०० बस घेण्याचे नियोजन केले आहे. या बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यामध्ये ३० आसने असून १५ बर्थ (स्लीपर) आहेत. बसच्या उजव्या बाजुला प्रत्येक आडव्या रांगेत दोन तर डाव्या बाजुला एक आसन असेल. या बसची निविदा प्रक्रिया सुरू असून साधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस बस ताफ्यात येऊ शकतात. या बस रातराणी म्हणून मार्गावर धावणार आहे. प्रामुख्याने लांबपल्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी या बस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती सुत्रांनी दिली.काही वर्षांपुर्वी वातानुकूलित शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या १२२ शिवनेरी व अश्वमेध या गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत. त्यानंतर दीड वर्षांपुर्वी आलेल्या शिवशाही बसने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले आहे. आसनी तसेच स्लीपर या दोन्ही श्रेणीतील अनुक्रमे ९३९ व ९० बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. यातील काही बस भाडेतत्वावरील आहेत. आणखी सुमारे एक हजार बस घेण्याचे नियोजन आहे. शिवनेरी व शिवशाहीने एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्यांना पसंती मिळत आहे. आता त्यात रातराणीची भर पडणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ----------------आसनी व स्लीपर अशा दोन्ही सुविधा असलेली बस पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात येणार आहे. या बस घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू सध्या सुरू आहे. त्यामुळे बस ताफ्यात कधी येणार हे आताच सांगु शकत नाही. - रणजितसिंंह देओलउपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकएसटी महामंडळ------------------आसनी व शयनयान सुविधा : पहिल्यांदाच २०० बस येणार ताफ्यातएसटीच्या ताफ्यातील बससाधी परिवर्तन - १४,८२० हिरकणी (निम आराम) - ९५४यशवंती (मिडी बस) - २५२मानव विकास योजनेतील बस - ८७२शिवनेरी व अश्वमेध - १२२शिवशाही - १०२९शहरी वाहतुक - ४१६-------------------एकुण - १८,४६५--------------------नवीन बसचे नियोजनसाधी - ७०० (२०० विठाई)रातराणी - २०० ----------------एकुण - १३००खासगी ट्रव्हल्सकडून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या तुलनेत सुमारे दीड पट जादा तिकीट घेतले जाते. मात्र, सणासुदीच्या काळात अनेक ट्रॅव्हल्सकडून अवाजवी भाडे घेतले जाते. पण पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव हे भाडे देऊन प्रवास करावा लागतो. पण शिवनेरी व शिवशाहीमुळे अ़नेक प्रवासी एसटीकडे वळले आहेत. आता ह्यरातराणीह्ण प्रवाशांना आणखी दिलासा मिळणार असल्याचे एसटीतील अधिकाºयांनी सांगितले....................

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र