शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

एसटीचे प्रवासी झाले डिजिटल; दररोज काढली जातात १० हजार तिकीटे

By सचिन लुंगसे | Updated: May 22, 2024 17:55 IST

दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती या सवलतीचे ‍आगाऊ आरक्षण मिळू शकते

मुंबई - एसटी महामंडळाने १ जानेवारीपासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु केलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ जानेवारी ते २० मे पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकीटाची विक्री नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त असून, सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारीपासून बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. त्यातील दोषांचे निर्मुलन झाल्याने ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास सोपी झाली आहे. दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती या सवलतीचे ‍आगाऊ आरक्षण मिळू शकते. त्यासाठी संकेतस्थळाबरोबरच ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.- ऑनलाईन आरक्षण करताना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या संपर्क साधावा.- नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु आहे.- ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या क्रमांकावर संपर्क करा.

टॅग्स :digitalडिजिटलstate transportएसटी