ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला ६ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:12 IST2025-05-18T15:11:38+5:302025-05-18T15:12:37+5:30
या प्रकरणांतील दंडाच्या रकमेची वसुली चालकाच्या पगारातून करण्यात येते. अनुचित घटना घडू नये यासाठी एसटीच्या बस ताशी ८० किमी वेग मर्यादेवर लॉक करण्यात आल्या आहेत.

ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला ६ कोटींचा दंड
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आरटीओने घालून दिलेली ताशी ८० किलोमीटर व घाट सेक्शनमध्ये ताशी ४० किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडणाऱ्या एसटी बसवर कारवाई करण्यात येते. हा नियम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एसटीकडून ६ कोटी रुपयांहून अधिक दंड आरटीओने वसूल केला असून त्यात सर्वांत जास्त ८० लाख रुपये दंडाची रक्कम एसटीच्या ठाणे विभागाने भरली आहे.
या प्रकरणांतील दंडाच्या रकमेची वसुली चालकाच्या पगारातून करण्यात येते. अनुचित घटना घडू नये यासाठी एसटीच्या बस ताशी ८० किमी वेग मर्यादेवर लॉक करण्यात आल्या आहेत.
एसटी चालकांना कोंडीत काही वेळा लेन कटिंग करून प्रवाशांना ठरलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचवावे लागते. त्यामुळे या नियमातून एसटी बससाठी शिथिलता द्यायला हवी, असे एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.