एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:40 IST2025-08-05T17:40:02+5:302025-08-05T17:40:36+5:30

Pratap Sarnaik News: चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ST Corporation will run the official Yatri app of the state government, announced Transport Minister Pratap Sarnaik. | एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई -  चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये   केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर , परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या  खाजगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी अ‍ॅप  बस, रिक्षा , टॅक्सी व ई-बस या वाहन सेवा करीता सुरू करण्याचे निश्चित केले आहे. सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने  एसटी महामंडळा मार्फत  सुरू करण्यात येईल.  भविष्यात एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

" छावा राईड " नावावर एकमत..!
या ॲप ला जय महाराष्ट्र, महा - राईड, महा-यात्री, महा-गो  छावा राईड यापैकी एखादे नाव देण्या बाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲप ला " छावा राईड ॲप "  हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने  हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: ST Corporation will run the official Yatri app of the state government, announced Transport Minister Pratap Sarnaik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.