मोठी बातमी! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 16:31 IST2021-12-24T16:29:38+5:302021-12-24T16:31:42+5:30
संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालय, लातूर व यवतमाळकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

मोठी बातमी! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार..!
मुंबई - एसटीच्या संपात (ST Strike) सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची, कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात (Labor court) तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. (Labor court slaps to ST employees)
लातूर व यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नियोजीत कामावर गैरहजर राहणे, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे. या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.
या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालय, लातूर व यवतमाळकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.