पोस्टमॉर्टेमनंतर कुटुंबीयांना सोपवलं श्रीदेवींचं पार्थिव शरीर, उद्या होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 18:43 IST2018-02-25T18:43:34+5:302018-02-25T18:43:34+5:30

बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवींचं हृदयविकाराच्या झटक्यानं शनिवारी रात्री दुबईत निधन झालं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली.

Sree Shiva's body will be postponed to postmortem after tomorrow | पोस्टमॉर्टेमनंतर कुटुंबीयांना सोपवलं श्रीदेवींचं पार्थिव शरीर, उद्या होणार अंत्यसंस्कार

पोस्टमॉर्टेमनंतर कुटुंबीयांना सोपवलं श्रीदेवींचं पार्थिव शरीर, उद्या होणार अंत्यसंस्कार

मुंबई- बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवींचं हृदयविकाराच्या झटक्यानं शनिवारी रात्री दुबईत निधन झालं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. मुंबईतल्या श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. दुबईत श्रीदेवींच्या पार्थिव शरीराचं पोस्टमॉर्टेम पूर्ण झालं असून, त्यांचे पार्थिव शरीर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान चार्टर्ड विमानातून श्रीदेवींचं पार्थिव शरीर मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतून दुपारी एकच्या सुमारास निघालेलं चार्टर्ड विमान दुबईत संध्याकाळी 4 वाजता पोहोचलं आहे. तिथून श्रीदेवींचं पार्थिव शरीर घेऊन हे विमान 5 वाजताच्या सुमारास निघालं असून, रात्री 8 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत सोमवारी सकाळी श्रीदेवींच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. मात्र, दुसरी मुलगी जान्हवी कपूर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती.
मृत्यूपूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या श्रीदेवी
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. भाचा मोहिम मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला.  पण याचदरम्यान शनिवारची रात्र श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि पडताक्षणी बेशुद्ध झाल्या. त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.

श्रीदेवी, त्यांचे पती बोनी कपूर, मुलगी खुशी असे सगळेच मोहितच्या लग्नासाठी गेले होते. याशिवाय अख्खे कपूर घराणे या लग्नात सहभागी झाले होते. अभिनेते संजय कपूर हेही या सोहळ्याला हजर होते. शनिवारी रात्री १२ वाजता संजय दुबईहून मुंबईत पोहोचले. पण येथे पोहोचताच त्यांना श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळली. त्यांनी लगेच दुबईची फ्लाईट पकडली आणि ते आल्या पावली माघारी परतले.

Web Title: Sree Shiva's body will be postponed to postmortem after tomorrow