The speed of recovery is faster than the speed of patient found | रुग्णवाढीच्या गतीपेक्षा बरे होण्याचा वेग जास्त

रुग्णवाढीच्या गतीपेक्षा बरे होण्याचा वेग जास्त

अमोल मचाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अवघ्या १५ दिवसांत देशात ‘कोविड-१९’च्या रुग्णांनी एका लाखावरून दोन लाखांचा टप्पा गाठला असल्याने चिंतेत भर पडली आहे. असे असले, तरी उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रुग्णांच्या गतीपेक्षाही वेगाने वाढले आहे. याच काळात देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १२ दिवसांत दुप्पट झाले आहे. शिवाय, एकूण रुग्णांमधील; तसेच ‘क्लोज केसेस’मधील घटलेले मृतांचे प्रमाण पाहता, देशात रुग्ण वेगाने वाढत असले, तरी या रोगाच्या तीव्रतेत घट होत असल्याचे स्पष्टपणे दिसते.


देशात ‘कोविड-१९’ रुग्णसंख्येने मंगळवारी (दि. २) २ लाखांचा टप्पा ओलांडला. १ लाखाचा टप्पा १८ मे रोजी गाठल्यानंतर, १५ दिवसांत देशातील रुग्णसंख्या दुप्पट झाली. याच वेळी उपचारानंतर बरे होणाऱ्यांच्या संख्येचा विचार करता वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण होणारी चिंता नक्कीच कमी होण्याजोगी स्थिती आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ पर्यंत ९६ हजार ५३४ जण बरे झाले आहेत. १८ मेपर्यंत ३९ हजार २७७ रुग्ण बरे झाले होते. या काळात दुपटीने रुग्णवाढ झाली असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे अडीच पटीने वाढले आहे.


एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदराचा विचार करता १५ दिवसांत तो ३.१४ वरून २.८० टक्क्यांपर्यंत कमी झाला. याच काळामध्ये एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचार सुरू असलेल्यांचे प्रमाण ८.५४ टक्क्यांनी कमी झाले आहे. (अधिक माहितीसाठी पहिला तक्ता बघावा).
उपचाराचे निष्कर्ष (बरे झालेले वा मृत) हाती आलेल्या संख्येचा अर्थात ‘क्लोज केसेस’चा विचार करता या १५ दिवसांत बरे होणाºयांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यासोबत मृतांचे प्रमाणही कमी झाल्याचे दुसºया तक्त्यावरून दिसते. देशात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ‘क्लोज केसेस’मध्ये बरे होणाºयांचे प्रमाण वाढणे आणि मृतांचे प्रमाण कमी होणे, हे संसर्गाची तीव्रता कमी होत असल्याचे निदर्शक आहे.

महाराष्ट्रात बरे होणाºयांचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले !
देशाच्या रुग्णसंख्येप्रमाणे महाराष्ट्रातील रुग्णसंख्यादेखील १५ दिवसांत दुपटीने वाढली; मात्र या काळात बरे होणाºयांचे प्रमाण देशापेक्षा जास्त भरते. १८ मे रोजी राज्यात ३५ हजार ५८ रुग्ण होते. त्यापैकी ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले. मंगळवारी सायंकाळी ७ पर्यंत आढळलेल्या एकूण ७० हजार १३ रुग्णांपैकी ३० हजार १०८ जण उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देऊन बरे झाले. १८ मेच्या तुलनेत बरे होणाºयांचे हे प्रमाण साडेतीन पट जास्त आहे.
एकूण रुग्णांमध्ये मृतांचे प्रमाण ३.५६ वरून ३.३७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत एकूण रुग्णांपैकी बरे होणाºयांचे प्रमाण २४.०६ टक्क्यांवरून थेट ४३ टक्क्यांवर गेले आहे.
उपचारानंतरच्या ‘क्लोज केसेस’चा विचार करता देशाप्रमाणे राज्यातदेखील ‘कोविड-१९’ची तीव्रता कमी होत असल्याचे स्पष्ट होते. यात मृतांचे प्रमाण १२.८९ वरून ७.२७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. बरे होणाºयांच्या प्रमाणात १८ मे रोजी ८७.११ होते. ते आता ९७.१३ टक्के असे प्रभावीपणे वाढले आहे.

नागरिकांनी घाबरू नये, पण संकट टळलेले नाही
रुग्णांची संख्या २ लाखांवर गेल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये; पण संकट टळलेले नाही. मास्क घालणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग ही मूलतत्त्वे पाळणे अनिवार्य आहे; अन्यथा ‘सेकंड वेव्ह’ येऊ शकते. ती अधिक भयानक असेल. मास्क की व्हेंटिलेटर, याची निवड आपण
करायची आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट

संथ गतीने का होईना, उद्रेक नियंत्रणात येतोय...
एकूण रुग्णांतील बरे होणाºयांचे वाढते प्रमाण आणि मृतांचे कमी झालेले प्रमाण, या गोष्टींवरून संथ गतीने का होईना ‘कोविड-१९’चा उद्रेक नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होते. २ लाख रुग्ण झाले असले तरी प्रसाराचा दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. मार्चमध्ये तो ४ पट होता. आता तो १.२३ पर्यंत खाली आला आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The speed of recovery is faster than the speed of patient found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.