शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

शहरी रस्त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती; वर्षातून एकदा होणार आॅडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:22 AM

अपघात रोखण्यासाठी निर्णय; अपघातप्रवण क्षेत्रांची वर्षातून दोनदा होणार तपासणी

- गौरीशंकर घाळे मुंबई : शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून वर्षातून एकदा शहरी भागातील संपूर्ण रस्त्याचे आॅडिट केले जाणार असून अपघातप्रवण क्षेत्रांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्षातून दोनदा तपासणी केली जाणार आहे.दिल्ली एकात्मिक वाहतूक व्यवस्थेकडून शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सूचना स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका आणि नगर परिषदेसाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. पालिका स्तरावरील समितीचे प्रमुख पद आयुक्तांकडे तर नगर परिषदांचे समिती प्रमुखपद संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. या समितीत वाहतूक पोलीस, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि स्थानिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेषत: अपघातप्रवण क्षेत्र सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागातील सूत्रांनी दिली. शहरी भागातील रस्ते अपघातांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने रस्ते अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेला दिले होते. उच्चाधिकार समितीच्या आदेशानंतर दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेने आपला अहवाल सादर केला. यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. संबंधित शहरी रस्त्यांच्या आॅडिटनंतर आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या पाठपुराव्याची जबाबदारी विशेष समितीवर असणार आहे.पहिल्या ५०मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकरस्ते अपघातांबाबत केंद्रीय वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक अपघातांच्या ५० शहरांच्या यादीत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. २०१७ साली मुंबईत एकूण ३१६० अपघात झाले. यात ४९० लोक दगावले तर ३२८७ जखमी झाले. तर पुण्यातील १५०८ अपघातांत ३७२ ठार तर ११५४ जण जखमी झाले. नागपुरातील १२४२ अपघातांत २३१ जणांना आपले प्राण गमावावे लागले तर १२५६ जण जखमी झाले. नाशिकमधील ६३१ अपघातात १७१ ठार तर ५१० जखमी झाले. एका वर्षाच्या कालावधीत या चार महानगरातील अपघातात एकूण १२६५ जण ठार झाले असून ६२०७ जण जखमी झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात