शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

युतीत पुन्हा ठिणगी? भाजपचा नवा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:52 IST

प्रत्येकी १३५-१३५ जागा : तर १८ जागा मित्रपक्षांना

यदु जोशी मुंबई: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांना सोबत घेऊनही भाजपने ३०३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. महाराष्ट्रातही हाच फॉर्म्युला वापरायचा आणि शिवसेनेवर अवलंबून राहण्याची पाळीच येऊ द्यायची नाही, अशा हालचाली भाजपत सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप-शिवसेनेने प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात आणि उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना देण्याचा नवा प्रस्ताव भाजपकडून पुढे करण्यात आला आहे.

भाजपच्या या फॉर्म्यूल्याने शिवसेनेच्या भुवया उंचावल्या असल्या तरी अजून काही ठरलेलेच नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी असा फॉर्म्यूला शिवसेनेला मान्य नसल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढतील, असे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुगली टाकून लहान मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जातील आणि उर्वरित २७० जागांपैकी प्रत्येकी १३५ जागा भाजप-शिवसेना लढतील, असे जाहीर केले.

२०१४च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला १२२, रासपाला १ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. सात अपक्षांनी देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यात बहुमतासाठी १४५ जागा आवश्यक आहेत. युतीमध्ये १३५ जागा लढवायच्या आणि १३० पर्यंत जागा निवडून आणायच्या. मित्रपक्षांनाही कमळावर लढायला सांगायचे. त्यातील दहाएक जागा जिंकल्या की आकडा १४० पर्यंत जातो, जो बहुमताच्या जवळ असेल. २०१४ मध्ये सुरुवातीला शिवसेनेचा पाठिंबा नसूनही फडणवीस यांनी सरकार टिकविले होते. केंद्रात मिळालेल्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला १२५हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी होती. शिवसेनेकडील लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे जवळपास ४० आमदार आहेत.

मित्रपक्षांच्या हाती कमळ!भाजपच्या मित्रपक्षांमध्ये रासपा, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पार्टी हे युतीमध्ये भाजपचे मित्रपक्ष आहेत. आमचे उमेदवार आमच्याच चिन्हावर लढतील, असे रासपाचे प्रमुख महादेव जानकर यांनी म्हटले असले तरी त्यांच्या उमेदवारांच्या हातीही कमळ देण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019