शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

अकोल्यात सोयाबीनची आवक ३५ हजार क्विंटलवर पोहोचली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:45 AM

बाजारगप्पा : अकोल्याच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर प्रतिदिन सरासरी नऊ हजार क्विंटल आवक आहे

- राजरत्न सिरसाठ (अकोला)

पश्चिम विदर्भात  सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून, अकोला जिल्ह्यातील बाजारात दररोज ३५ ते ४० हजार क्ंिवटल आवक सुरू  आहे. अकोल्याच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर प्रतिदिन सरासरी नऊ हजार क्ंिवटल आवक आहे; परंतु दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अकोला जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती देत जवळपास दोन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पोषक ठरल्याने सोयाबीन पीक जोमाने वाढले; परंतु फुलोऱ्यावर येण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घ खंड दिल्याने बरड, नदीकाठची, तसेच जेथे कमी पाऊस झाला, तेथे उतारा कमी आला.

बरड व नदीकाठच्या जमिनीत एक ते दीड क्विंटल, जेथे भारी जमीन होती; पण पाऊस कमी झाला, तेथे एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा आला, तसेच भारी जमीन आहे, पाऊस बऱ्यापैकी झाला, अशा ठिकाणी एकरी ५ ते ८ क्विंटल उत्पादन आहे. म्हणजेच यावर्षी पीक चांगले असूनही पावसाने वेळेवर दगा दिल्याने सोयाबीन उत्पादनाचा उतारा असमान आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही यात निघणे कठीण आहे. असे असताना बाजारात मात्र प्रतवारीचे निकष लावण्यात येत असल्याने सोयाबीनचे दर घटले आहेत. मागील पंधरवड्यात प्रतिक्ंिवटल दर सरासरी ३,१०० रुपयांवर पोहोचले होते; परंतु सोयाबीनची आवक केवळ ५० ते ५५ क्ंिवटल होती. या आठवड्यात काढणी सुरू  झाल्याने सोयाबीनची आवक वाढली आहे; परंतु आर्द्रता असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी २,६०० रुपये प्रतिक्ंिवटल दराने खरेदी सुरू  केली आहे.

या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सरासरी प्रतिक्विंटल दर २,८५० रुपये आहे; पण प्रतवारीचे निकष लावण्यात येत असल्याने दर २,६०० रुपयेच आहे. बुधवारी येथे ९,८४६ क्ंिवटल, तर गुरुवारी ६,८०५ क्ंिवटल सोयाबीनची आवक होती. म्हणजेच गुरुवारी दर घटताच सोयाबीनची आवक तीन हजार क्ंिवटल कमी झाली.

दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू  करण्यात आले नसल्याने सणासुदीच्या दिवसांत अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता जरी दर कमी असले, तरी लवकरच हे दर प्रतिक्ंिवटल ३,१०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता अकोला बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी वर्तविली आहे.

दरम्यान, गुरुवारी बाजारात हरभरा सरासरी चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल, तर आवक ८२१ क्ंिवटल होती. तूर सरासरी ३,६०० रुपये, तर आवक ६४८ क्ंिवटल होती. मुगाचे सरासरी दर ४,९०० रुपये होते; पण आवक ४३६ क्ंिवटल एवढीच होती. उडदाची आवक २८८ होती. दर सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विं टल होते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी