शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीची ५० टक्के क्षेत्रावर पेरणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:22 IST

राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्यात रब्बी पिकाच्या एकूण ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीराज्यात काही ठिकाणी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम

पुणे: राज्यात रब्बी पिकाची पेरणी प्रगतीपथावर असून आत्तापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.त्यात ज्वारी पिक वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत,गहू उगवण,मुकुटमुळे फुटण्याच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा अवस्थेत आहे.त्याचप्रमाणे हरभरा पिक वाढीच्या,फुलोरा तर काही ठिकाणी घाटे धरणे,घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून राज्यात २१ डिसेंबरपर्यंत रब्बी पिकाच्या एकूण ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.तर राज्यात खरीप हंगामातील भात नाचणी,ज्वारी,भुईमुग पिकांची कापणी/काढणी अंतिम टप्प्यात आहे.तूर पिक शेंगा धरणे पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू आहे.तसेच कापूस पिक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असून वेचणी प्रगतीपथावर आहे.राज्यात काही ठिकाणी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने आपल्या अहवाल व्यक्त केली आहे.पुणे विभागात रब्बी पिका खालील क्षेत्र १७.८३ लाख हेक्टर असून त्यातील ६.४० लाख हेक्टर क्षेत्रावर (३६ टक्के)पेरणी झाली आहे.विभागातील ज्वारी पीक वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत ,मका पिक वाढीच्या तर गहू पिक उगवण ते मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे.त्याच प्रमाणे हरभरा पिक उगवण,फांद्या फुटण्याच्या तर काही ठिकाणी फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे.विभागात काही ठिकाणी जमिनितील ओलाव्या आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून काही पिके सूकू लागली आहेत. लाभ क्षेत्रात व नदीकाठच्या क्षेत्रावर गऊ व हरभरा पिकांची पेरणी सुरू आहे.प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील १२० हेक्टर ज्वारी क्षेत्रावर व मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव अढळून आला आहे.कोकण विभागात रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून नागपूर विभागात ८० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.नागपूरपाठोपाठ अमरावती विभागात ७२ टक्के,कोल्हापूरात ६२ टक्के,लातूर विभागात ५८ टक्के तर नाशिकमध्ये ४६ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.........राज्यात उशीरा लागवड झालेल्या कापूर पिकावर डिसेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेल्या १ हजार ५२३ गावांपैकी ७८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर दिसून आला आहे.मात्र बोंड अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे काही गावांमधील बोंड अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात आलेला आहे,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे...............................अहमदनगर जिल्ह्यात ४ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर,औरंगाबादमध्ये १ हजार ८४१ आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव असल्याचे दिसून आले आहे.एकूण १९ हजार ९९६  हेक्टर क्षेत्रावरील ऊसावर हुमणी प्रादूर्भाव आहे.

 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस