शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचं पथक घरी पोहोचताच शिवसेना नेते आनंद अडसूळांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 12:13 IST

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई - सिटी  को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळयाच्या आरोपप्रकरणी अमरावतीचे माजी शिवसेना खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे. एवढेच नाही, तर अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवली येथील घरी सकाळी 8 वाजल्यापासून छापेमारी सुरू झाली आहे. यानंतर, आता अडसूळ यांची प्रकृती अचानकच खालावली. त्यांना रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाईफ लाईन मेडीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अभिजीत अडसूळही त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे.सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर होऊनही मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नाही, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला आहे. ईडीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले जात आहे. 

दरम्यान, मुंबई येथील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने हे समन्स बजावल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून, सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. ईडीने याआधीही अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली होती.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय