मुंबई - अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लोकभवनात साधेपणाने शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला जय पवार होते. मात्र पार्थ पवार कुठे होता असा प्रश्न सगळ्यांना पडला. अजित पवारांची राख सावडण्याच्या दिवशीच प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले. त्याच रात्री सुनेत्रा पवार मुलगा जयसह मुंबईसाठी निघाल्या. या सर्व घडामोडीत शरद पवारांना अनभिज्ञ ठेवल्याचे समोर आले. शपथविधीच्या सकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी मला काही कल्पना नाही असं सांगितले.
या घडामोडीतच राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत विविध दावे समोर आले. खुद्द शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात होती. सर्व काही ठरले होते. १२ फेब्रुवारीला याची घोषणा होणार होती असा दावा केला. त्यानंतर याच दाव्यावर जयंत पाटील यांनीही भाष्य केले. अजित पवार आणि माझ्यात ८ ते १० बैठका झाल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजित पवारांची अंतिम इच्छा होती आणि तो त्यांचा तीव्र आग्रह होता असं जयंत पाटील यांनी सांगितले. शरद पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर बारामतीत गोविंदबागेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला पोहचले होते. याठिकाणी पार्थ पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांची चर्चा झाली. त्याचवेळी मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ नेतेपदी निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेच ५ वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा पार्थ पवार हे बारामतीतच होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. त्यात भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत असं विधान केले. त्याशिवाय राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची काही शक्यता नाही असाही दावा केला. मात्र माध्यमांमध्ये हे झळकताच पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी माझी नियुक्ती झाली नाही. आमचा पक्ष लोकशाही मानतो. त्यामुळे सर्व आमदार, नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होईल असं स्पष्ट केले. सुनील तटकरे यांनीही अद्याप पटेल यांची नियुक्ती झाली नाही असा खुलासा केला. मात्र भाजपा नेत्याकडून प्रफुल पटेल यांचं नाव पुढे करणे यावरून राजकीय चर्चांना उधाण आले.
पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास विरोध?
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राज्यसभेवर जाण्यास पार्थ पवार इच्छुक आहे परंतु पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपाचा विरोध असल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील जमीन घोटाळ्यातील वादात पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भाजपाचा पार्थ पवार यांच्या नावाला विरोध आहे. परंतु जय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपा तयार असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर कोण जाणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
Web Summary : Sunetra Pawar became Deputy CM after Ajit Pawar's move. Parth's absence sparks speculation. NCP merger talks revealed. BJP's potential Rajya Sabha picks create intrigue, sidelining Parth due to land controversy.
Web Summary : अजित पवार के बाद सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनीं। पार्थ की अनुपस्थिति से अटकलें। एनसीपी विलय की चर्चा सामने आई। भाजपा की राज्यसभा की संभावित पसंद में पार्थ को भूमि विवाद के कारण किनारे किया गया।