शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या शंकामध्ये कुठेतरी तथ्य, मुख्यमंत्री त्यांच्या मित्राच्या घातपाती मृत्युचा छडा...", अमोल मिटकरी आता काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:11 IST

Ajit Pawar Plane Crash Amol Mitkari: अजित पवारांचे बारामती विमानतळावर झालेल्या अपघाती मृत्युबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवारांनी अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप केला आहे. आमदार अमोल मिटकरींनी यावर पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. 

"आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या, त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे", असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याकडे लक्ष वेधले आहे. अजित पवारांचा मृत्यू घातपात आणि षंडयंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाच्या तंदरुस्तीपासून ते पायलटच्या भूमिकेपर्यंत त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत. आणि हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. या विमान अपघाताची परदेशातील संस्थेकडून चौकशी केली जावी, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली असून, त्याला आता आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दिला आहे. 

"षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत"

आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, "आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली आहे.  

"मुख्यमंत्र्यांना नुकतंच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही", असा विश्वासही आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे. 

शेवटच्या क्षणी पायलट बदलला, ट्राफिकचा मुद्दा

आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीमध्येही पत्रकार परिषद घेऊन या अपघातांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य पायलट कपूर यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई, मद्य प्राशन केल्याचा वाद हे मुद्दे रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. 

अजित पवारांच्या विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आला होता. पायलट ट्रॉफिकमध्ये अडकल्यामुळे पायलट बदलला गेल्याचे सांगितले गेले. पण, इतक्या पहाटे मुंबईत ट्राफिक जाम असणे शक्य नाही, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. 

रोहित पवारांनी विमानाच्या मेंटेनन्सबद्दल आणि ज्या कंपनीकडे या विमानाच्या मेंटेनन्सचे काम आहे, तिच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amol Mitkari supports probe into Ajit Pawar's death, suspects foul play.

Web Summary : Amol Mitkari backs Rohit Pawar's call for an external investigation into Ajit Pawar's death. Mitkari suspects foul play and believes the Chief Minister will uncover the truth behind his friend's demise, addressing concerns about the pilot change and maintenance.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAjit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस